Saturday, April 27, 2024

Latest Posts

मैदानावरचा “अँग्री यंग मॅन” च्या नावावर आणखी एक विक्रम, आशियामधील पहिला व्यक्ती

भारताचा क्रिकेटपटू आणि भारताच्या संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर अनेक विक्रम नोंदवलेले आहेत. आता विराट कोहलीच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद त्याच्या नावावर झाली आहे.

भारताचा क्रिकेटपटू आणि भारताच्या संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर अनेक विक्रम नोंदवलेले आहेत. आता विराट कोहलीच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद त्याच्या नावावर झाली आहे. विराट कोहलीच्या इंस्टाग्रामवर २५० दशलक्ष फॉलोअर्स (First Asian to Reach 250 Millions Followers) पार करणारा पहिला आशियामधील व्यक्ती बनला आहे. इंस्टाग्राममध्ये हा विक्रम करणारे या आधी २ व्यक्ती आहेत त्यामधील पहिला म्हणजेच फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर (Cristiano Ronaldo) हा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला आहे. विराट कोहली हा तिसरा खेळाडू आहे.

किंग कोहलीने अजून एक विक्रम करून त्याच्या नावाचाच नाही तर देशाचा सुद्धा तुरा उंचावला आहे. विराट कोहलीचे चाहते फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात आहेत. विराट कोहली हा आशियामधील विक्रम करणारा विराट कोहली हा पहिला खेळाडू आहे. विराट कोहली हे नाव फक्त भारतीय क्रिकेटशी जोडलेले नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. विराट मैदानावर अँग्री यंग मॅन अशी त्याची ओळख आहे. तो त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच अपडेट देत असतो. तो त्याचे मैदानावरची फोटोस असो की त्याच्या खासगी जीवनामधील काही आठवणी तो त्याच्या चाहत्यांना त्याबद्दल अपडेट देत असतो.

विराट नुकताच त्याचा आरसीबीच्या संघाचे आव्हान संपवून आता तो त्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. विराटने क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम तर त्याच्या नावावर तर केले आहेत. विराटने आयपीएलमध्ये सर्वाधिक आठ शतकं ठोकण्याचा विक्रमही स्वत:च्या नावे केला आहे. त्याचबरोबर त्याने या आयपीएल २०२३ च्या सीझनमध्ये दमदार कामगिरी केली आहे. परंतु त्यांचा संघ प्लेऑफच्या शर्यतीपासून हुकला.

विराटने त्याच्या इंस्टाग्रामवर २५० दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. मेटा कंपनीची मालकी असलेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असणाऱ्या आशियाई व्यक्तींच्या यादीमध्ये विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. त्यांनतर या यादीमध्ये कॅप्टन कूल एमएस धोनी ४२.२ दशलक्ष फॉलोअर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर ४०.३ दशलक्ष फॉलोअर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss