Wednesday, May 8, 2024

Latest Posts

उदयनराजेंनी घड्याळ चिन्हांवर निवडणूक लढवावी, पण कमळ चिन्हांवर राजे ठाम

महायुतीमधील सातारा लोकसभा मतदार संघातील जागा (Satara Lok Sabha Constituency) भाजप आणि राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरत आहे.

महायुतीमधील सातारा लोकसभा मतदार संघातील जागा (Satara Lok Sabha Constituency) भाजप आणि राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातच साताऱ्यातील जागा उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना देण्यावर एकमत झाला आहे. तर महायुतीमधली जागा राष्ट्रवादीकडे राहणार असल्याने अजित पवारांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव अजित पवार यांनी मांडला आहे. मात्र उदयनराजे हे कमळावर लढणार असल्याचे ठाम आहे. त्यामुळे साताऱ्यातील महायुतीचा तिढा सुटला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

उदयनराजे भोसले हे सातारा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये उदयनराजे भोसले यांचे नाव नसल्याने त्यांनी दिल्ली गाठली. तीन दिवसांआधी दिल्लीमध्ये जाऊन रात्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे अमित शाहांच्या भेटीनंतर काय तोडगा निघणार हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे. तसेच अजित पवार गटाकडून साताऱ्यातील जागा सोडली जाणार नाही. सातारा लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तसेच महायुतीमध्ये या जागेवर दावा करण्यात आला होता. अश्यातच उदयनराजे भोसले निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याने ही जागा त्यांना दिली जाण्याची शक्यता आहे. उदयनराजेंना राष्ट्रवादीकडून घड्याळ या चिन्हांवर लढण्याचा प्रस्ताव अजित पवार यांनी दिला होता. मात्र उदयनराजे भोसले कमळ या चिन्हावर ठाम असल्याचे बोलले जात आहे.

सातारा लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार निश्चित करण्यात आला आहे. मात्र हा उमेदवार कोणत्या पक्षाकडून लढणार हे निश्चित करण्यात आलेले नाही. उदयनराजे भोसले जर येथून निवडणूक लढवणार असतील, तर त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवली पाहिजे, अशी भूमिका अजित पवारांची आहे. मात्र सातारा लोकसभा मतदार संघाची जागा भाजपनेच लढवावी यावर उदयनराजे ठाम आहेत. मागील ३ दिवसांपासून उदयनराजे दिल्लीमध्ये आहेत त्यांनी तिथे जाऊन अमित शाह यांची भेट घेतली.

हे ही वाचा:

घरच्या घरीच बनवा कुरकुरीत फणसांच्या गऱ्यांचे चिप्स

२०१९ च्या निवडणुकीचा बदला घेण्यासाठी आढळराव पाटील निवडणूक लढत आहेत – अमोल कोल्हे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss