Thursday, May 2, 2024

Latest Posts

मतदानाचा पहिला टप्पा सुरु, VISHAL DADLANI ने दिला मोलाचा संदेश

सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क बजवण्यास आवाहन केले जात आहे. अश्यात नागरिकांनी आपले मत देखील बनवले असेल कि यावेळी त्यांचे मत कुणाला जाईल. मशीन वरती 'नोटा' (NOTA) हा पर्याय देखील असतो. बऱ्याचदा नागरिक या पर्यायाचा वापर देखील करतात. यावरतीच प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानी याने त्याच्या सोशल मीडिया हॅन्डल वरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

सध्या निवडणुकीचे वारे देशभरात वाहत आहे. सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले जात आहे. अशात नागरिकांनी आपले मत देखील बनवले असेल की यावेळी त्यांचे मत कुणाला जाईल. मशीनवर ‘नोटा’ (NOTA) हा पर्याय देखील असतो. बऱ्याचदा नागरिक या पर्यायाचा वापर देखील करतात. यावरच प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानी याने त्याच्या सोशल मीडिया हॅन्डल वरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये विशाल नागरिकांना नोटा बटन न दाबण्याचा संदेश देत आहे. त्यावेळी विशाल एअरपोर्ट वर दिसून येत आहे. त्याचबरोबर आपली फ्लाईट डिले झाल्याचं देखील तो कळवतो. सध्या विशाल त्याच्या म्युजीक शो मध्ये व्यस्त आहे. व्हिडीओ मध्ये विशाल सांगतो की, ‘मी पाहिलंय तुमच्यातील बरेच जण ‘नोटा’ म्हणजेच ‘यापैकी कोणीही नाही’ याबद्दल बोलत आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की, समजा जर १०० लोक मतदान करीत असतील त्यातील ९९ जर नोटाचे बटन दाबत असतील आणि कुणीतरी एक जण गल्लीतल्या गुंड्याला वोट देत असेल मग ती ९९ लोक ज्यांनी नोटाचे बटन दाबले आणि आपला राग व्यक्त केला, त्यांचे वोट वाया जातील आणि त्या एका मताने तो गल्लीतला गुंड निवडून येईल. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की, कृपया ‘नोटा’ चे बटन दाबू नका आपले वोट वेस्ट घालवू नका. देश सध्या गंभीर स्थितीमध्ये आहे. तुम्हा सगळ्यांना माहितीये देशात काय चाललंय, भ्रष्टाचार कुठल्या मार्गावर चालला आहे. जर तुम्हाला हे बदलायचे असेल तर तुमचं एक योग्य वोटच तुमचं उत्तर असू शकत.’

तरी लोकांना असा गैरसमज असतो की, जर अधिकाधिक लोकांनी ‘नोटा’ या बटनावर क्लिक केले तर इलेक्शन कमिशन पुन्हा मतदान आयोजित करते. तरी विशाल याने त्यांना असे काहीही नसते असे सांगितले. याचबरोबर लोकांनी जर ‘नोटा’ दाबल्याने फरक नसेल पडत तर ते बटन आहे तरी कशासाठी अशी प्रतिकिया देत नाराजी व्यक्त केली. तरी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजाववा असे आवाहन करताना लोक दिसून येत आहेत. महाराष्ट्रात आजपासून मतदान चालू झाले आहे.

हे ही वाचा:

Mahayuti मध्ये धुसफूस कायम, Mihir Kotecha यांच्या प्रचारसभेतून शिवसैनिकांनाच सभात्याग

‘ऑरेंज कॅपच्या’ स्पर्धेतदेखील किंग कोहली अव्वल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss