Sunday, May 5, 2024

Latest Posts

तंत्रविद्या शिकताय? तंत्रविद्याचा अभ्यास न करूनही याप्रकारे घडवा चमत्कार…

एका राज्यात एक मोठा राजा असतो. या राजाकडे पैसे खजिने यांची कमी नसते मात्र तरीही हा राजा सुखी नसतो. त्याचेकारण म्हणजेच बरेच वर्ष होऊन सुद्धा या राजाला संतानप्राप्ती होत नसते. यासाठी राजा भरपूर प्रयत्न असतो. एके दिवशी या राजाची आणि एका तांत्रिकाची भेट होते.

एका राज्यात एक मोठा राजा असतो. या राजाकडे पैसे खजिने यांची कमी नसते मात्र तरीही हा राजा सुखी नसतो. त्याचेकारण म्हणजेच बरेच वर्ष होऊन सुद्धा या राजाला संतानप्राप्ती होत नसते. यासाठी राजा भरपूर प्रयत्न असतो. एके दिवशी या राजाची आणि एका तांत्रिकाची भेट होते. त्या तांत्रिकाकडून राजाला असे सांगण्यात येते की जर एका लहान मुलाचा बळी दिला तर राजाला संतानप्राप्ती होईल ही काळ्या दगडावरची रेष आहे. हे ऐकल्यावर संतानप्राप्तीसाठी आतुर झालेला राजा हा आनंदाने उड्या मारू लागला. राजाने त्याच्या राज्यात दवंडी पेटवली कि जो कोणी राजाला त्याचे लहान मुलं बळीसाठी देईल त्यास राजाकडून पैश्यांचा वर्षाव करण्यात येईल. ही दवंडी राज्यातील एका दरिद्री माणसाने ऐकली. या दरिद्री माणसाला चार मुलं होती आणि या चार मुलांपैकी सर्वात लहान मुलाला राजाकडे सोपवायचे असे त्या व्यक्तीने ठरवले. त्या व्यक्तीचा लहान मुलगा साधारण पाच सहा वर्षाचा असून त्याला घेऊन तो राजाकडे गेले. राजाची भेट घेऊन आपला मुलगा तो राजाकडे सोपवतो. ठरल्याप्रमाणे त्या दरिद्री व्यक्तीला बऱ्याच सुवर्णमुद्रा मिळतात.

लहान मुलाला छान कपडे परिधान करण्यास दिले, भोजन दिले. त्यानंतर मांत्रिकाने बळी देण्याचा दिवस ठरवला. पण सगळ्यात आधी त्या धाकट्या मुलाने अगदी थोड्या वाळूची मागणी केली. राजा खुश असल्यामुळे त्याने त्या धाकट्या मुलाची इच्छा पूर्ण करून त्याला वाळू आणून दिली. त्या लहान मुलाने वाळूची चार महाले राजा आणि मांत्रिकाच्या समोरच बनवली. महाले बनवून झाल्यावर त्या लहान मुलाने एक एक कडून तीन महाले तोडली आणि चौथ्या महालाकडे डोळे मिटून बसला. काही वेळात डोळे उघडून तो राजाला म्हणाला आता माझा बळी दिलात तरी चालेल. मुलाचे बोलणे ऐकून राजा आणि मांत्रिकाने आश्चर्याने भुवया उंचावल्या. लहान मुलाने केले तरी काय असा प्रश त्यांना पडू लागला. मुलालाही मांत्रिक विद्या येत असल्याचा संशय मांत्रिकाला येऊ लागला. मुलाला याबद्दल विचारल्यावर मुलगा म्हणाला,”मी हे चार महाल बनविले त्यामध्ये पहिला महाल माझ्या माता पित्याचा होता. माझ्या मात्यापित्यानी माझ्या रक्षणाची चिंता न करता बळी देण्यासाठी तुमच्या स्वाधीन केले. म्हणून मी त्यांचा महाल पाडला. दुसरा महाल पाडण्याचे कारण म्हणजे ज्या समाजात मी राहतो त्यांनी देखील माझे या बळीपासून रक्षण केले नाही. तिसरा महाल राजे सरकार तुमचा होता. तो मोडल्याचे कारण म्हणजे तुमची जबाबदारी तुमच्या प्रजेचे रक्षण करणे हि आहे मात्र इथे तुम्हीच माझा बळी घ्यायला निघाला. चौथा महाल आहे देवाचा आता शेवटचा पर्याय म्हणून मीच देवाकडे सर्व भार टाकला आहे आणि मी स्वतःला तुमच्या स्वाधीन करतो”.

त्या लहानग्या मुलाचे बोलणे ऐकून राजा भारावून गेला. मुलाचे बोलणे ऐकून राजाला समज आली. आपल्या सुखासाठी एका लहान मुलाचा बळी देणार होतो? त्यापेक्षा त्या मुलाला दत्तक घेण्याचा विचार का नाही केला? असे राजाला वाटू लागले. राजाने मुलाचा बळी देण्याचा निर्णय रद्द करत त्या मुलाला दत्तक घेण्याचे ठरवले. थोडक्यात या घटने मागे असा निष्कर्ष आहे की, कितीही मोठे संकट आले तरी त्या संकटातून वाट काढण्यासाठी आपली विवेक बुद्धी जागृत असली पाहिजे.

हे ही वाचा:

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ?

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, राहुल नार्वेकर म्हणाले…

Biporjoy वादळाचा वाढता धोका! पुढील २४ तासांत दिसू शकते रौद्र रूप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss