Sunday, May 28, 2023

Latest Posts

आजचे राशिभविष्य, २६ मे २०२३, आजचा दिवस……

आजच्या दिवशी घरात कोणत्याही प्रकारचे वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या.

माझी रास

मेष – आजच्या दिवशी घरात कोणत्याही प्रकारचे वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. घरातील सदस्यांशी सामंजस्याने वर्तन करा. अन्यथा घरातील वातावरण दूषित होऊन त्याचा मानसिक त्रास आपल्यालाच होऊ शकतो.

वृषभ – आजच्या दिवशी कोणतेही अवास्तव धाडस करण्याचा प्रयत्न कराल. मात्र त्यावर सर्व बाजूंनी विचार करणे आवश्यक राहील. घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नये.

मिथुन – आज कुटुंबीयांसमवेत जास्तीत जास्त वेळ घालवाल. मात्र आपल्या वाणीवर व रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. आपल्या बोलण्याने कुटुंबातील सदस्यांची नाराजगी ओढावणार नाही याची दक्षता घ्या.

कर्क – आजच्या दिवशी नावीन्यपूर्ण उत्साहाचा अनुभव घ्याल. काही नवीन गोष्टी करण्याकडे कल राहील. त्यात जोडीदाराचे मतही विचारात घ्या.

सिंह – आजच्या दिवशी काही अप्रिय घटना, गोष्टी यांना सामोरे जाऊ लागू शकते. अचानकपणे काही खर्च उद्भवतील. खर्चाचा योग्य ताळमेळ आज बांधावा लागेल.

कन्या – आज काही लाभाची, सौख्याची प्राप्ती संभवते. अपेक्षेपेक्षा कमी लाभ मिळतील. मात्र निराश न होता, आहे त्यात समाधान मानणे योग्य असेल. संततीकडे लक्ष द्यावे लागेल.

तुळ – आज प्रामाणिकपणे आपले नियोजित काम पूर्ण करण्याकडे लक्ष असू द्या. उद्योग व्यवसायात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

वृश्चिक – आजच्या दिवशी भाग्याची, सौख्याची प्राप्ती होईल. त्यामुळे उत्साह वाढेल. काही दूरचे प्रवास संभवतात. मात्र प्रवासात योग्य काळजी घेणे आवश्यक राहील.

धनु – आजच्या दिवशी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबात काही वादविवाद सारखे प्रसंग उभे राहू शकतात. सामंजस्याने प्रश्न सोडवा.

मकर – आज जोडीदाराशी स्नेहाचे, सामंजस्याचे, सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या भावना, त्याची मते यांचा आदर करा.

कुंभ – आजच्या दिवशी काहीसे प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी मनस्तापासारखे प्रसंग उद्भवू शकतात.

मीन – आजच्या दिवशी संततीच्या काही समस्या जाणवु शकतील. संततीला वेळ देणे आवश्यक असेल. त्यांचे शिक्षण, आरोग्य, करियर, स्वप्ने याविषयी त्यांच्याशी चर्चा करा.

पं केतन पाठक गुरुजी
माऊली ज्योतीष कार्यालय
९८९२४१३८६०

Latest Posts

Don't Miss