Tuesday, April 30, 2024

Latest Posts

Vat Pournima 2023: ‘या’ कारणासाठी साजरी करतात वटपौर्णिमा

वटपौर्णिमा ही दर वर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला विवाहित महिलांकडून मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. अनेक महिला वट सावित्रीचे व्रत धरतात. वट पौर्णिमा हि प्रामुख्याने महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते.

वटपौर्णिमा ही दर वर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला विवाहित महिलांकडून मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. अनेक महिला वट सावित्रीचे व्रत धरतात. वट पौर्णिमा हि प्रामुख्याने महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. यादिवशी विवाहित महिला या वडाच्या झाडाची पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत बायका आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. आपल्या पतीच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी या महिला निर्मळ मनाने वट वृक्षाची पूजा करतात. तसेच आपल्याला जन्मोजन्मी हाच पती किंवा आत्ताच्या भाषेत नवरा मिळू दे यासाठी विवाहित महिला ह्या वट सावित्रीचे व्रत करतात. यावर्षी वटपौर्णिमा ही ३ जून २०२३ रोजी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाणार आहे.

तुम्हाला माहित आहे का? वडाच्या झाडाची पूजा का करतात. पौराणिक कथेनुसार भगवान शिव शंकर यांचे लक्ष संसारात नसल्यामुळे त्यांना पार्वती देवींनी शाप दिला होता. रागावलेल्या पार्वतीदेवींनी श्री भगवान शिव शंकर यांना तू वृक्ष होशील असा शाप दिला आणि त्या शापाप्रमाणे ते वटवृक्ष झाले. कथेनुसार जटावेळी महाप्रलय झाला तेव्हा पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टींचा नाश झाला परंतु त्यावेळी सुध्दा हे वटवृक्ष पृथ्वीवर खंबीरपणे आपले पाय रोवून उभेच राहिले होते. वटवृक्षाला अक्षयवट असे देखील म्हंटले जाते त्याचेकारण म्हणजे वटवृक्षाच्या प्रत्येक फांदी, पारंबी व त्याच्या पानांमधून देखील नवा वटवृक्ष जन्माला येतो. आणि म्हणूच स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे प्रतीक मानून त्याच्याकडे साकडे घालतात. वटवृक्षाला गीतेच्या जन्माचा साक्षीदार म्हणून त्याला मानले जाते व त्याची पूजा केली जाते. आपल्या नवऱ्याला चांगले आयुष्य लाभावे व आपले वैवाहिक जीवन सुखी संपन्न व्हावे यासाठी महिला वट सावित्रीचे व्रत अगदी उत्साहाने पाळतात. म्हणून स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात.

वटवृक्षाचे महत्व असे आहे की , अशी एक आख्यायिका आहे, वटवृक्षाच्या खाली सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले होते. यमधर्माने जेव्हा सत्यवानाचे प्राण नेले तेव्हा सावित्रीने यमधर्माशी सलाग तीन दिवस यमराजामध्ये आणि सावित्रींमध्ये सत्यवानाला परत आणावे यासाठी शाब्दिक युद्ध झाले. आणि त्यानंतर यमराज सावित्रीवर प्रसन्न झाला आणि त्याने सावित्रीला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने आपल्या अंध सासू सासर्यांचे डोळे व राज्य आणि त्याचबरोबर आपल्याला अपत्य व्हावा असे मागितले. आणि म्हणूच यमधर्माला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले आहे. हिंदू धर्मानुसार या दिवशी शिवतत्त्वस्वरूपी शक्ती प्रकट स्वरूपात ब्रह्मांडात वास करते. वटवृक्षामध्ये साक्षात श्री भगवान शिव शंकराचे स्थान आहे. वटवृक्षची पूजा करणे म्हणजेच श्री महादेव यांची पूजा केल्या सारखे आहे. म्हणून दैवहीत महिला वटवृक्षाची पूजा करून श्री शंकराचीच एकप्रकारे आराधना करतात.तसेच आपल्या पतीला शिवरूपी मानून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात.

हे ही वाचा : 

ट्विटर वॉर : विवेक अग्निहोत्री vs उर्फी जावेद

केजरीवाल यांनी २००० रु.च्या नोटसंदर्भात पंतप्रधान यांची “त्या” शब्दात उडवली खिल्ली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss