Wednesday, May 1, 2024

Latest Posts

जंतरमंतर आंदोलनावर असलेल्या कुस्तीपटूंना क्रिकेटपटूंचा पाठिंबा

दिल्लीमध्ये जंतरमंतर आंदोलनावर बसलेले भारतीय कुस्तीपटूंचा वाद काही संपायचे नाव घेत नाही. भारतामधील कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर अनेक आरोप केले आहे.

दिल्लीमध्ये जंतरमंतर आंदोलनावर बसलेले भारतीय कुस्तीपटूंचा वाद काही संपायचे नाव घेत नाही. भारतामधील कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर अनेक आरोप केले आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी कुस्तीपटू जंतरमंतर आंदोलन दीड महिन्यापासून सुरु आहे. अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरु असूनही यावर कोणताही तोडगा काढला जात नाहीये त्यामुळे कुस्तीपटूंनी त्यांची पदके गंगेमध्ये विसर्जित करण्यात निर्णय देखील घेतला होता परंतु त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी तो निर्णय मागे घेतला.

कुस्तीपटूंनसोबत झालेल्या वागणुकीचा अनेकांनी निषेध केला. नव्या संसद भवनाच्या द्घाटनावेळी कुस्तीपटूंसोबत करण्यात आलेल्या वर्तवणुकीमुले आता १९८३ साली विश्वचषक विजेते भारतीय क्रिकेट संघाने निषेध नोंदवला आहे. या क्रिकेटपटूंनी सांगितले आहे की, आमच्या चॅम्पियन कुस्तीपटूंसोबत घडलेल्या प्रकारामुळे आम्ही सर्वजण व्यस्थित झालो आहोत. त्यांनी रातोरात केलेल्या मेहनतीने मिळवलेली पदके त्यांनी गंगा नदीमध्ये विसर्जित करण्याच्या निर्णयामुळे आम्ही चिंतेत आहोत असे क्रिकेटपटू म्हणाले.

पुढे क्रिकेटपटू म्हणाले की, त्या पदकांसाठी ते वर्षानुवर्षे मेहनत, त्याग, दृढनिश्चय आणि जिद्द आहे. त्यांनी मिळवलेली पदके फक्त त्यांचंच नाही तर संपूर्ण देशाचा अभिमान आणि आनंद आहे. त्यामुळे घाईमध्ये कोणताही निर्णय न घेण्याचे आवाहन आम्ही त्यांना करत आहोत. त्यांनी केलेल्या तक्रारी ऐकल्या जातील आणि त्याच्यावर काहीतरी तोडगा देखील काढण्यात येईल अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे देशामधील न्यायव्यवस्थेला त्यांचे काम करू द्या असे क्रिकेटपटूंचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

SSC 10th Result 2023, यंदा इयत्ता दहावीचा राज्याचा निकाल लागला 93.83 टक्के

Sharad Pawar – Eknath Shinde यांच्या भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

शिवराज्याभिषेक दिनानिम्मित Raj Thackeray यांनी केली पोस्ट शेअर, माझी एक तीव्र इच्छा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss