Saturday, April 27, 2024

Latest Posts

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनकडे आहे ‘एवढ्या’ कोटीची संपत्ती,पती अभिषेक बच्चनलाही टाकले मागे

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या घटस्फोटाची चर्चा चालू आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या घटस्फोटाची चर्चा चालू आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी ‘प्रतीक्षा’ बंगला लेक श्वेता नंदा हिच्या नावावर केला आहे. तेव्हापासून ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये आलबेल नसल्याचे सांगण्यात आले आहे. ऐश्वर्या राय १० ० कोटींपेक्षा जास्त कमाई करते.यामध्ये तिने पती अभिषेक बच्चनला मागे टाकला आहे.

ऐश्वर्या राय बच्चनची एकूण संपत्ती १०० मिलियन डॉलर म्हणजेच ८२८ कोटीच्या आसपास आहे. ऐश्वर्या दाक्षिणात्य सिनेमांसह अनेक मोठं-मोठ्या ब्रँडचं प्रमोशन आणि जाहिराती देखील करते.या जाहिरातींच्या माध्यमातून तिला चांगलेच पैसे भेटतात. ऐश्वर्या अनेक ब्यूटी प्रोडक्टच्या देखील जाहिराती करते. या जाहिरातीतून कोटीवधी रुपये तिला भेटतात. ऐश्वर्या राय बच्चनने लग्नानंतर खूप कमी चित्रपटात काम केला आहे. खूप निवडक चित्रपटांना ती होकार देते. एका चित्रपटाचे ती १० ते १२ कोटी रुपये इतके मानधन घेते. फक्त एका जाहिरात माध्यमातून ती ९० कोटी रुपयांची कमाई करते. आणि एका दिवसाचे ब्रँड प्रमोशन करण्यासाठी ती ६ ते ७ कोटी रुपये घेते. ऐश्वर्या राय बच्चन अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडचा चेहरा आहे.आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील जाहिरातींच्या माध्यमातून ती कोट्यवधी रुपये कमावते.

ऐश्वर्या राय बच्चनची बीकेसीमध्ये ५BHK असा आलीशान अपार्टमेंट आहे. तिने हि अपार्टमेंट २०१५ मध्ये खरेदी केली होती. या अपार्टमेंटची किंमत २१ कोटी रुपये इतकी आहे. मुंबईमधील वरळी येथे ऐश्वर्यची आणखी एक लग्झरी अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटची किंमत ४१ कोटीच्या आसपास आहे.ऐश्वर्या राय बच्चनची मुंबईसह दुबईमध्ये सुद्धा मोठी प्रोपेर्टी आहे. दुबईतील सेंचुरी फॉल्स परिसरात ऐश्वर्याने एक आलिशान व्हिला खरेदी केला आहे.या व्हिलाची किंमत १५.६कोटी रुपये आहे. ऐश्वर्या राय बच्चनकडे अनेक ,महागड्या आणि आलिशान अश्या गाड्या आहेत. ऐश्वर्याला कार कलेक्शन करायला आवडतात. ऐश्वर्याकडे ७.९५ कोटींची रोल्स रॉयस घोस्ट कार आहे. काही वर्षांपूर्वी हि गाडी तिने विकत घेतली होती.तसेच ऐश्वर्याकडे लेक्सस एलएक्स ५७० आणि ऑडी ए८एल रुपयांची कारचा हि समावेश होतो . तिला वेगवेगळ्या कारमधून फिरायला आवडत. बच्चन कुटुंबियांच्या गाड्यांचा ती वापर करत नाही.

हे ही वाचा:

हा फक्त महाराजांचा अपमान नाही, तर…किरण मानेंच्या पोस्टने वेधले साऱ्यांचे लक्ष

ठाकरेंच्या हालचालींना वेग; कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंच्या विरोधात केदार दिघे अशी लढत होण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss