Friday, April 26, 2024

Latest Posts

बिग बी यांना बसला जबरदस्त दंड; पोलिसांनी केली कारवाई

बॉलीवूडचा महान अभिनेता अमिताभ बच्चन नेहमीच चर्चेत असतात. महानायक अमिताभ बच्चन हे वयाने वयस्कर झाले असले तरीसुद्धा त्यांच्यातला अभिनेता हा तरुणच आहे. वयाची ८० व्या वर्षी सुद्धा अमिताभ बच्चन हे एका तरुण अभिनेत्याला लाजवतील इतक्या उत्साहाने अजूनही चित्रपटांमध्ये, टेलिव्हिजन एड्स(Television Ads ) मध्ये आपल्याला काम करताना दिसून येतात.

बॉलीवूडचा महान अभिनेता अमिताभ बच्चन नेहमीच चर्चेत असतात. महानायक अमिताभ बच्चन हे वयाने वयस्कर झाले असले तरीसुद्धा त्यांच्यातला अभिनेता हा तरुणच आहे. वयाची ८० व्या वर्षी सुद्धा अमिताभ बच्चन हे एका तरुण अभिनेत्याला लाजवतील इतक्या उत्साहाने अजूनही चित्रपटांमध्ये, टेलिव्हिजन एड्स(Television Ads ) मध्ये आपल्याला काम करताना दिसून येतात. त्यांच्यातला हा कलाकार कधीच वयस्कर होणार नाही उलट अधिक उत्साहाने काम करत राहील. बिग बी हे ८० वर्षाचे असूनही दिवसातले १२ ते १४ तास काम करतात. प्रत्येक लोकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. बिग बी यांना अनेक आजार असून मागील वर्षी त्यांनी कोरोनासारख्या भयंकर आजारावर मात करून देखील ते त्याच जोशाने उत्साहाने काम करतात. पण अमिताभ बच्चन यांच्यावर मुंबई पोलीस कारवाई करणार असल्याची बातमी समोर आली आहे.

हल्लीच बिग बी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये बिग बी एका अनोळखी व्यक्तीच्या बाईक वरून जाताना दिसले होते. त्यांना त्यांच्या शूट साठी सेट वर पोहोचायचे होते. सध्या सगळ्याच शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. वाहतूक कोंडी असल्यामुळे त्यांना सेटवर जायला उशीर होत होता. म्हणून त्यांनी एका अनोळखी व्यक्तीची मदत घेतली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला. त्याला मोठ्या संख्येने views मिळाले. बिग बी यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले होते. परंतु आता हाती आलेल्या माहितीनुसार बिग बी यांच्यावर आता कारवाई होणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी अमिताभ बच्चन याना हेल्मेट घातले नसल्यामुळे त्यांच्यावर दंड आकारला आहे आणि वसूल करणार आहेत अश्या चर्चा होत आहेत. काही नेटकऱ्यांनी बिग बी यांच्या विरोधात सोशल मीडियावर तक्रार केली होती.

बीग बी यांच्या व्हिडीओ नंतर बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा हीचा व्हिडीओ देखील वायरल झाला. या व्हिडीओ मध्ये अनुष्का हि तिच्या बॉडीगार्ड सोबत बाईक वर जाताना दिसून आली. अमिताभ बच्चन व अनुष्का शर्मा या दोघांनीही वाहतुकीचे नियम मोडले असल्या कारणाने त्यांच्यावर कारवाई होण्याचे समजत आहे. या दोघाचेही व्हिडीओस मोठ्या प्रमाणात वायरल झाले आहेत. या त्यांच्या हेल्मेट न घालण्याच्या वागणुकी मुळे नेटकरी प्रचंड संतापले असून त्यांच्यावर कारवाई व्हावी अश्या मागण्या सोशल मीडियावर केल्या. अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर वायरल झाला असून नेटधारकांनी मुंबई पोलिसांना तो व्हिडीओ टॅग करत लिहिलं की, दुचाकी चालवणारा आणि मागे बसलेला त्या दोघांनीही हेल्मेट घातलेलं नाही म्हणून मुंबई पोलिसांनी त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नेटकऱ्यांच्या या पोस्टमुळे मुंबई पोलिसांनी त्याची दाखल घेतलेली आहे.

हे ही वाचा : 

दुपारची झोप येतेय? हे उपाय नक्की ट्राय करा

सामन्यापूर्वीच अर्जुन तेंडुलकरच्या हाताला घेतला बाइट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss