Saturday, April 27, 2024

Latest Posts

jitendra Joshi चा National Award Winning ‘हा’ सिनेमा लवकरच पाहता येणार OTT वर…

जितेंद्र जोशी हा अनेकांच्या मनावर राज करणारा अभिनेता आहे. जितेंद्र जोशीने आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांच्या मनात आपला ठसा उमटवला आहे.

जितेंद्र जोशी हा अनेकांच्या मनावर राज करणारा अभिनेता आहे. जितेंद्र जोशीने आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांच्या मनात आपला ठसा उमटवला आहे. या अभिनेत्याचे असंख्य चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. काहीच दिवसांपूर्वी जितेंद्र जोशींच्या ‘गोदावरी’ (Godavari) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गाजवले. नदीच्या प्रवाहासोबत माणसाच्या जीवनाचा प्रवास सांगणारा असा हा चित्रपट असून लवकरच प्रेक्षकांना आपल्या मोबाईल ,टीव्ही तसेच लॅपटॉप वर हा चित्रपट पाहायला मिळणार आहे.

प्रेक्षकांनी गोदावरी सिनेमाला भरभरून प्रेम दिले. तसेच प्रेक्षकांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही तुफान कमाई केली. परंतु अनेकांनी हा चित्रपट पहिला नसेल किंवा पुन्हा पाहायचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ‘गोदावरी’ हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट कधी व कुठे पाहावा ते जाणून घ्या.

गोदावरी चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन (Nikhil Mahajan) यांनी केले असून जितेंद्र जोशी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. ‘गोदावरी’ हा चित्रपट लवकरच जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या ३ जूनला डिजिटल प्रीमियरद्वारे गोदावरी हा चित्रपट सर्वांच्या भेटीला येणार आहे. आनंदाची बातमी म्हणजे हा चित्रपट विनामूल्य आपल्याला पाहता येणार आहे.

या चित्रपटात जितेंद्र जोशीसह नीना कुलकर्णी (Neena Kulkarni), विक्रम गोखले (Vikram Gokhale), गौरी नलावडे(Gauri Nalavde), प्रियदर्शन जाधव (Priyadarshan Jadhav) आणि संजय मोने (Sanjay Mone) या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची कथा आपल्याला नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठी राहणाऱ्या एका कुटुंबाभोवती फिरताना दिसते. भावना, आव्हाने आणि मानवी नातेसंबंधांच्या हलक्या पदराचा वेध हा चित्रपट घेतो. गोदावरी या चित्रपटाची कथा निखिल महाजन व प्राजक्त देशमुख यांची आहे.

हे ही वाचा:

“The Kerala Story” चित्रपटावर Raj Thackeray चं मोठं विधान

Modi सरकारचे झाले कौतुक! भारताचा केला कायापालट, Morgan Stanley चा अहवाल जाहीर…

महिला कुस्तीपटूंचे प्रकरण केंद्र सरकार संवेदनशीलपणे हाताळत आहे, Anurag Thakur

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss