Friday, May 3, 2024

Latest Posts

श्रेयस तळपदे साकारणार अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका, फर्स्ट लूक आला समोर

श्रेयस तळपदे साकारणार अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका, फर्स्ट लूक आला समोर

मुंबई : श्रेयस तळपदे नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतो. आणि त्यामध्ये आपल्याला तो यशस्वी देखील होताना दिसतो. श्रेयस ज्याप्रमाणे आपल्या कामाच्या बाबतीत खूपच एकनिष्ठ आहे. तो त्याची प्रत्येक भमिकेला अगदी बारकाईने अभ्यासकरून त्यावर काम करतो. आता देखील श्रेयस अशाच एका दमदार भूमिकेतून आपल्या समोर येणार आहे.

हेही वाचा :

ऋता दुर्गुळेचा टाईपमास 3 च्या सेटवर झाला अपमान, बघा काय म्हणाली ऋता

कंगना राणौतच्या लूकनंतर आता हळूहळू संपूर्ण चित्रपटाच्या स्टारकास्टचा लूक समोर येत आहे. आता अभिनेता श्रेयस तळपदेचीव्यक्तिरेखा समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेचकंगना राणौतने या चित्रपटातील तिचा लूक शेअर केला आहे. या चित्रपटात अभिनेत्री कंगना राणौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधीयांची भूमिका साकारत आहे. कंगना राणौतच्या लूकनंतर आता हळूहळू संपूर्ण चित्रपटाच्या स्टारकास्टचा लूक समोर येत आहे. आता अभिनेता श्रेयस तळपदेची व्यक्तिरेखा समोर आली आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेतदिसणार आहे. त्याचा फर्स्ट लुक त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

श्रेयस ने त्याचा फर्स्ट लूक त्यांच्या इंस्टाग्राम वर शेअर केला असून, अटल बिहारी वाजपेयी यांची एक एक कविता शेअर केली आहे. आणि लिहले आहे, हि भूमिका साकारताना मला फार आनंद होत आहे, मी तुम्हा सगळ्यांचा अपेक्षेत पूर्ण उतरीन. तसेच श्रेयसनेकंगनाचे आभार देखील मानलेत. तो मला या भूमिकेसाठी माझी निवड केलीत यासाठी खूप धन्यवाद. एक व्हर्सटाइल्स अभिनेत्रीआहेस. अभिनेत्री सोबत तू एक उत्तम दिगदर्शक देखील आहेस.

Latest Posts

Don't Miss