Friday, May 3, 2024

Latest Posts

मोरूची मावशी फेम विजय चव्हाण यांचा लेकही आहे उत्तम अभिनेता, ‘या’ मालिकेत केलंय काम

विजय चव्हाण अर्थातच सर्वांचे लाडके विजू मामा यांनी आपला उत्तम अभिनयाचा छापा सर्वत्र उमटवला आहे. आपल्या उत्कृष्ठ अभिनयाने त्यांनी अनेकांची मने जिंकली आहे. आपल्या सर्वोत्तम अभिनयाने ते आज सर्वत्र ओळखले जातात. त्यांच्या सर्वोत्कृष्ठ अभिनयशैलीमुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

विजय चव्हाण अर्थातच सर्वांचे लाडके विजू मामा यांनी आपला उत्तम अभिनयाचा छापा सर्वत्र उमटवला आहे. आपल्या उत्कृष्ठ अभिनयाने त्यांनी अनेकांची मने जिंकली आहे. आपल्या सर्वोत्तम अभिनयाने ते आज सर्वत्र ओळखले जातात. त्यांच्या सर्वोत्कृष्ठ अभिनयशैलीमुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अश्या या महान अभिनेत्याचे निधन हे २०१८ साली झाले असले तरी आजही ते प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. आजवर त्यांनी अनेक नाटक, सिनेमे करून त्यात महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यांचे मोरूची मावशी हे नाटक आजही अजरामर आहे. त्यांच्या दर्जेदार अभिनयामुळे यांनी मोरूची मावशी हे नाटक अव्वल क्रमांकावर नेऊन ठेवले.

अश्या या महान अभिनेताच्या मुलानेही कलाविश्वात पाऊल ठेवले आहे. आपल्या बाबांचा वारसा तो पुढे नेत त्याने आजवर अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केले आहे. विजू मामा यांच्या मुलाचे नाव वरद चव्हाण आहे. वरद ने अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपांमध्ये उत्तमरीत्या काम केले आहे. हल्लीच त्याने एका मालिकेत काम केले होते. ‘आई मायेचं कवच’ या मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्या मालिकेबरोबरच त्याने ऑन ड्युटी २४६तास, धनगरवाडा अशा चित्रपांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याने आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. लेक माझी लाडकी, १०० डेज या मालिकेमधून वरद हा घरोघरी पोहोचला.

दरम्यान विजय चव्हाण यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. त्यांच्या सर्वच भूमिका प्रेक्षकांमध्ये गाजल्या आहेत. आपल्या अभिनयाच्या उत्तम कारकिर्दीत त्यांनी लोकांना नाट्यवेड बनवल आणि नाट्यवेडयाना अजूनच नाटकाचं वेड लावला. त्यांची नाटके ही प्रचंड प्रसिद्ध आहेत. श्रीमंत दामोदर पंत, मोरूची मावशी अश्या उत्तमोत्तम नाटकांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारलेल्या आहेत. तयांचे अनेक चित्रपट सुद्धा सुपरहिट झाले आहेत. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत अश्या अनेक चित्रपांमध्ये त्यांनी काम केले आहे. जत्रा या चित्रपटामधील त्यांच्या भूमिकेची लोक अजूनही आठवण काढतात.

हे ही वाचा : 

रोहित पवारांच्या रॅप सॉंगची चर्चा तरुणांमध्ये

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss