Thursday, May 2, 2024

Latest Posts

‘टाइमपास ३’ टीमने धरला रिक्षाचालकांसोबत ठेका

चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. त्यापैकीच एक ट्रेंडिंग गाणे म्हणजे 'वाघाची डरकाळी'. नुकताच ठाण्यातील रिक्षा स्टँडवर हृता दुर्गुळे, प्रथमेश परब, मनमीत पेम यांनी या गाण्यावर ठेका धरला.

मुंबई: ऋता दुर्गुळे आणि प्रथमेश परबच्या टाईपमास या सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे. याआधी आलेले ‘टाईमपास’ आणि ‘टाईपमास २’ या सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात चांगलेच घर केले होते. या सिनेमातील कलाकार, गाणी नृत्य सगळ्याच गोष्टी अगदी लक्षात राहण्यासारख्या आहेत. आता ‘टाईमपास ३’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सिनेमाच्या निम्मिताने प्रथमेश आणि ऋता हि नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा:

ऋता दुर्गुळेचा टाईपमास 3 च्या सेटवर झाला अपमान, बघा काय म्हणाली ऋता

‘टाइमपास३’ चा सर्वत्र बोलबाला आहे. चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. त्यापैकीच एक ट्रेंडिंग गाणे म्हणजे ‘वाघाची डरकाळी’. नुकताच ठाण्यातील रिक्षा स्टँडवर हृता दुर्गुळे, प्रथमेश परब, मनमीत पेम यांनी या गाण्यावर ठेका धरला. या वेळी त्यांना रिक्षाचालकांनीही साथ दिली. विशेष म्हणजे यात काही महिला रिक्षाचालकही होत्या. या प्रसंगी दिग्दर्शक रवी जाधवही उपस्थित होते.

क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबध्द केलेल्या या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर हे गाण्याला वैशाली सामंतचा ठसकेबाज आवाज लाभला आहे. झी स्टुडिओज आणि अथांग कम्युनिकेशन्स निर्मित, रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास ३’ येत्या २९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. टाईमपास ३ या सिनेमासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत.

Latest Posts

Don't Miss