Friday, April 26, 2024

Latest Posts

आपण ‘ग्रुपिझम’कडे सकारात्मकतेनं पहिले पाहिजे, दिप्ती देवी

दिप्ती देवीला (Deepti Devi) 'मला सासू हवी' या मालिकेमधून प्रसिद्धी मिळाली आणि महाराष्ट्रामध्ये घराघरात पोहोचली. नाटक, मराठी मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून दिप्ती देवी प्रेक्षकांच्या भेटला येत असते.

दिप्ती देवीला (Deepti Devi) ‘मला सासू हवी’ या मालिकेमधून प्रसिद्धी मिळाली आणि महाराष्ट्रामध्ये घराघरात पोहोचली. नाटक, मराठी मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून दिप्ती देवी प्रेक्षकांच्या भेटला येत असते. ती आजही इंडस्ट्रीमध्ये एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे सतत हसतमुख असणारी दिप्तीने नुकतेच मनोरंजनसृष्टीतील गटबाजीचा संदर्भामध्ये भाष्य केले आहे. दीप्ती देवीने नुकतंच महाराष्ट्र टाईम्सला मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये तिला चित्रपटसृष्टीतलया गटबाजीबद्दल तिला प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर ती म्हणाली की, चित्रपट सृष्टीमध्ये गटबाजी कायम असते पण तुम्ही याकडे सकारात्मक नजरेने पहिले पाहिजे असे तिने उत्तर दिले.

पुढे ती म्हणाली की, आपण ‘ग्रुपिझम’कडे सकारात्मकतेनं पाहिल्यास एकमेकांबरोबर काम करताना आपल्यातला आत्मविश्वास वाढतो आणि त्यामुळे गटबाजी होणे किंवा असणे हे फार्स नैसर्गिक आहे. मला सुद्धा अनेकजण आतपतच्या ग्रुपमध्ये दिसण्यावरून बोलू शकतात. पण शेवटी तो तुमचा कम्फर्टचा भाग आहे. एखादा ग्रुप बनण्याचा भाग असतो. कलाकार म्हणून आम्ही नेहमीच संधीचे भुकेले आहोत. अनेक वेळा अनेक प्रोजेक्ट आणि काम पाहून ते माझ्यापर्यत का पोहोचले नाहीत असा विचार नेहमीच माझ्या मनात येतो. त्याचा फटका सुद्धा नक्कीच बसतो. कलाकार म्हणून मला माझी क्षमता माहिती आहे. इतर लोक त्याकडे कसे पाहतात हे मी ठरवू शकत नाही असे दीप्ती म्हणाली.

पुढे ती म्हणाली की, मा माझ्या कामाशी प्रामाणिक राहण्याला मी प्राधान्य देते. ग्रुपिझम चालतच राहणार आहे. त्यातून संधी शोधण्याची आणि मनापासून काम करायचं. जिथे आवश्यक आहे तिथे थेट सांगायचं की तुमच्यासोबत काम करायला आवडेल. कलाकार म्हणून स्वतःला चॅलेंज करत राहणं हीच माझ्यासाठी रोजची कार्यशाळा असते आणि अशा आव्हानांसाठी मी तयार राहते असे ती म्हणाली.

हे ही वाचा : 

अजित पवार यांच्या विषयावर संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली

मुंबईत उघडलेल्या पहिल्या अॅपलच्या स्टोअरचे नाव Apple BKC

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही उभारणार रोहिदास भवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss