Tuesday, April 30, 2024

Latest Posts

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अभिनेता कार्तिक आर्यन याने लावली हजेरी

मुंबईतील लालबाग (Lalbaugcha Raja) परिसरात गणपती बापाच्या आगमनामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .

मुंबईतील लालबाग (Lalbaugcha Raja) परिसरात गणपती बापाच्या आगमनामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे . गणेश भक्तानी लालबागच्या राजाच्या चरणी दर्शनासाठी गर्दी करायला सुरुवात केली आहे.भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावायला सुरुवात केली आहे. गणपती बापाच्या आगमनामुळे लालबाग नगरी सजली आहे. मोठ्या उत्साहात आणि आनंदात बापाचे आगमन झाले आहे. यावर्षी लालबागच्या राजाच्या मंडपात शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा बनवण्यात आला आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला पुढील वर्षी ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. या देखाव्याची कलाकृती दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाईंची यांच्या मार्गदर्शनातून साकारण्यात आली आहे. लालबागचा राजा हा नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जातो. यंदाच्या वर्षी लालबाग गणपती मंडळाचे ९० वे वर्ष आहे. आता दर्शनासाठी हळूहळू गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच आता बाप्पाच्या आगमनासाठी कलाकारांनी देखील हजेरी लावायला सुरुवात केली . बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याही वर्षी बाप्पाच्या दर्शनासाठी गेला आहे. कार्तिक आर्यन हा दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जातो. कार्तिकचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटली आला होता. कार्तिक हा त्याच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. ‘चंदू चॅम्पियन’ हा कार्तिकचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Latest Posts

Don't Miss