लालबागचा राजा हे मुंबईतील सार्वजनिक गणपती मंडळ आहे. या मंडळाची स्थापना १९३४ साली करण्यात आली. कोळी समाजामध्ये प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाला नवसाला पावणारा राजा म्हणून ओळखले जाते. या गणपतीची मूर्ती २० फूट एवढी आहे. मुंबईत ठिकठिकाणी गणेश चतुर्थीच्या आधी गणपतीचे आगमन केले जाते. लालबागचा राजाही आता मंडपात विराजमान झाला आहे. गणरायाच्या आगमनामुळे सगळीकडे मोठ्या उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लालबागच्या राजाचा मंडपातील देखावा नितीन चंद्रकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात येतो. यावर्षी या राजाचे ९० वर्ष आहे. यावर्षी सजावटीमध्ये शिवराज्याभिषेक देखावा साकारण्यात आला आहे.
Latest Posts
लालबागच्या राजाचा पहिला लूक
लालबागचा राजा हे मुंबईतील सार्वजनिक गणपती मंडळ आहे. या मंडळाची स्थापना १९३४ साली करण्यात आली.