spot_img
spot_img

Latest Posts

लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

गणेशोत्सवाची चाहूल लागली की लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांमध्ये पाद्यपूजनाच्या सोहळ्याचे वेध लागतात. लालबागच्या राजाची मूर्ती बाहेरून न आणता या ठिकाणीच घडवली जाते. त्याच्या पाद्यपूजनाच्या सोहळ्यानंतर मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरूवात होते. त्यामुळे लालबागचा राजा कार्यकर्त्यांमध्ये या सोहळ्याचं विशेष महत्त्व आहे. ‘नवसाला पावणारा बाप्पा’ अशी ख्याती असलेल्या मुंबईतील ‘लालबागचा राजा’ चे आज पाद्यपूजन विधी पार पाडण्यात आला. त्याच बरोबर आज संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर लालबागच्या राजाचे पूजन करण्यात आले.

दरवर्षी राजाच्या दर्शनाला देशभरातून लाखो भक्त येतात. गणेशोत्सव अवघ्या १०० दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वांनाच आता आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनचे वेध लागले आहेत. अशातच मुंबईतील अत्यंत मानाचा समजला जाणारा आणि अवघ्या जगभरात ज्याची ख्याती आहे अशा ‘लालबाग राजा’ या बहुमानाच्या गणपतीचे पाद्य पूजन आज पार पडले. यंदा मंडळाने कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने हे पाद्यपूजन केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. लालबागच्या राजाची मूर्ती ही बाहेरून न आणता त्याच ठिकाणी घडवली जाते. आणि तिथेच बाप्पाचे पाद्यपूजन केले जाते.दरवर्ष या पाद्य पूजन सोहळ्याच्या निमित्ताने हजारो मुंबईकर बाप्पाचे चरणस्पर्श करण्यासाठी जातात. अत्यंत मोठा सोहळा केला जातो.पण यंदा मात्र काही कारणास्तव राजाचे मूर्तिकार संतोष कांबळी यांच्या कार्यशाळेत बापपाचे पाद्य पूजन अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आले.

आज संकष्ट चतुर्थी निमित्ताने सकाळी ६ वाजता चिंचपोकळी येथील मूर्तीकारांच्या कार्यशाळेत अगदी मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.यंदा ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ९० वे वर्ष आहे. त्यामुळे यंदाचा उत्सव अत्यंत खास असणार आहे.’लालबागचा राजा’ मंडळाने नुकतेच पाद्य पूजनाचे फोटो सोशल मिडियावर शेयर केले असून, भाविकांना आता गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. तसेच यंदाचा बाप्पा हा वेगळ्याच जोशात बघायला मिळणार यात काही शंकाच नाही . मात्र यावर्षी निर्बंध मुक्त गणेश उत्सव साजरा करता येतोय, त्यामुळे एक वेळा उत्साह या लालबाग परिसरात या वर्षी पाहायला मिळतोय लालबाग राजा पाद्य पूजन सोहळा लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अधिकृत फेसबुक पेज, ट्विटर, यु ट्यूब वर ऑनलाइन पाहायला मिळणार आहे. लाखो भाविक लालबागच्या राजाची वाट पाहत असतात. त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.

हे ही वाचा:

काही जिल्ह्यात अचानक औरंगजेबाच्या औलादी पैदा झाल्या हे शोधावं लागेल – देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे गटाला अजून एक धक्का

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss