Sunday, April 28, 2024

Latest Posts

मार्गशिर्षातल्या पाचव्या गुरुवारी अमावस्या लागल्याने पुजा करावा की नाही ?जाणुन घ्या

सध्या मार्गशिर्ष महिना सुरु आहे.खरतर यंदा मार्गशिर्ष महिन्यात चार गुरुवार कि पाच गुरुवार आहेत यासाठी सगळेच संभ्रमात होते,मात्र यंदा पाच गुरुवार आले आहेत.

सध्या मार्गशिर्ष महिना सुरु आहे.खरतर यंदा मार्गशिर्ष महिन्यात चार गुरुवार कि पाच गुरुवार आहेत यासाठी सगळेच संभ्रमात होते,मात्र यंदा पाच गुरुवार आले आहेत.दरम्यान हिंदू धर्मात श्रावण महिन्याला जसे महत्त्व आहे. तसेच मार्गशिर्ष महिन्यालाही महत्त्व दिले जाते. मार्गशीर्षातील व्रत-वैकल्य केल्याने पुण्य मिळते अशी धारणा आहे. त्यामुळे महिला वर्ग या महिन्यातील व्रत करतातच. यंदाच्या मार्गशीर्षाबाबत महिलांच्या मनात साशंकता आहे. कारण योगच तसा जुळून आला आहे.

यंदाच्या मार्गशीर्ष महिन्यात गुरूवार किती आहेत याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. दोनच दिवसात मार्गशीर्ष महिना संपणार आहे. मराठी कॅलेंडरनूसार दर आमावस्येला एका महिन्याचा शेवट होतो. तसाच मार्गशीर्षातील आमावस्येला हा महिना संपणार आहे.काही गृहीणींनी चौथ्या गुरुवारीचं उद्यापन करुन व्रताची सांगता केली आहे.पण ज्या गृहीणींचा चौथ्या गुरुवारी काही अडचणीनमुळे तो पुजायचा राहुन गेला असेल तर त्यांना हा पाचवा गुरुवार पुजता येणारं आहे,मात्र अमावस्या संपण्याच्या आधी ही पुजा करायची आहे.

त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरूवारी लक्ष्मी मातेची पूजा करायची की नाही, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. त्यामुळे, आमावस्या कधी सुरू होईल, गुरूवारची पूजा, व्रत करायचे की नाही,याबद्दल ज्योतिष शास्त्र काय म्हणते ते पाहुयात. पंचांगानुसार 12 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरूवात झाली आहे. जानेवारीतील आमावस्या ही बुधवारी रात्री 8 वाजून 11 मिनिटांनी लागणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरूवारी 11 जानेवारीला सायंकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी संपणार आहे.

दिवाळीमध्ये येणारं लक्ष्मीपूजन  हे आमावस्येदिवशीच असतं. त्यामुळे केवळ आमावस्या आहे म्हणून व्रत करणं शूभ मानलं जाणार नाही, असं नाही. तर त्या दिवशी व्रत करून देवीच्या पूजेची मांडणीही करा. तसेच, काही महिला या दिवशी व्रताचे उद्यापनही करतात.  अनेक स्त्रिया लक्ष्मीमातेच्या पूजेची मांडणी सकाळीच करून कथा वाचून घेतात. पण काही स्त्रिया गोरज मुहूर्तावर पूजा मांडतात. आमावस्या संपण्याची वेळ ही ५ वाजून २७ मिनिटांची आहे, त्यामुळे त्या दिवशी साडेपाच वाजण्याच्या आधी पूजेची मांडणी करून कथेच वाचनही करून घ्यावे.

हे ही वाचा:

बिनधास्त अंदाजातला सुष्मिता सेनचा ‘आर्या ३’ सिरीजचा जबरदस्त टीझर प्रदर्शित

पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे CM EKNATH SHINDE यांच्या हस्ते उद्धाटन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss