Saturday, April 27, 2024

Latest Posts

हॉटेल स्टाईल Tandoori Paneer Roll बनवा आता घरच्या घरीच….

आपल्यापैकी प्रत्येकालाच पनीर खूप आवडतं. खूप कमी जण असतील त्यांना पनीर किंवा पनीरचे पदार्थ आवडत नसतील. हॉटेलमध्ये गेल्यावर अनेकांचा भर हा पनीर आणि पनीरचे अनेक पदार्थ खाण्यावर असतो. पनीरच्या कोणत्याही पदार्थाला भारतीय हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

आपल्यापैकी प्रत्येकालाच पनीर खूप आवडतं. खूप कमी जण असतील त्यांना पनीर किंवा पनीरचे पदार्थ आवडत नसतील. हॉटेलमध्ये गेल्यावर अनेकांचा भर हा पनीर आणि पनीरचे अनेक पदार्थ खाण्यावर असतो. पनीरच्या कोणत्याही पदार्थाला भारतीय हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. अगदी लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पनीर खूप आवडत असते. तुम्ही तंदुरी पनीर रोल हा हॉटेलमध्ये जाऊन नक्कीच खाल्ला असाल किंवा त्याचे नाव तरी ऐकले असेल. पण तुम्हाला हाच हॉटेलमध्ये मिळणार चमचमीत तंदूर पनीर रोल घरी सुद्धा बनवता येणार आहे.

तुम्ही तंदुरी पनीर रोल सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाष्ट्याला बनवू शकता किंवा स्टार्टर म्हणून जेवणाच्या आधी देखील बनवून खाऊ शकता. हा टेस्टी (Tasty ) तंदूर पनीर रोल तुमच्या घरी सगळ्यांना आवडेल. टेस्टी सोबतच हा तंदूर पनीर रोल हेल्दी (Healthy )सुद्धा आहे. पनीर मध्ये भरवू कॅल्शिअम असत तसेच पनीर खाल्यामुळे आपल्या शरीराला योग्य प्रमाणात पनीर मिळते. चला तर मग जाणून घेऊया नक्की काय आहे या टेस्टी आणि त्याचबरोबर हेल्दी तंदूर पनीर रोलची रेसिपी.

तंदूर पनीर रोल बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

पनीरचे तुकडे १ कप
चिरलेला टोमॅटो आणि कांदा प्रत्येकी १ ते ४ कप
चिरून ठेवलेली शिमला मिरची १/४ कप
दही १ कप
आलं लसूण पेस्ट १ चमचा
हळद १/२ चमचा
काश्मिरी लाल मिरची १ चमचा
तंदूर मसाला २ चमचा
आवश्यकतेनुसार तेल
चवीनुसार मीठ
तयार मैदा रोटी

तंदूर पनीर रोल बनवण्यासाठी लागणारी कृती –

सर्वप्रथम पनीरचे १ इंच करून तुकडे तयार करा. एक भांड घ्या त्यामध्ये दही टाकून ठेवा आणि ते चांगल्या पद्धतीने फेटून घ्या आणि त्यात हळद, तिखट आणि तंदुरी मसाला घालून चांगले मिक्स करून घ्या. नंतर त्यामध्ये पनीरचे तुकडे, चिरलेला टोमॅटो, कांडा, आणि शिमला मिरचीचे तुकडे टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि साधारण ३० मिनिटे मॅरीनेट करण्यासाठी ठेवून द्या.

मॅरीनेट झाल्यावर एक नॉनस्टीकचा तवा घ्या. गॅस लावून तो मंद आचेवर ठेऊन त्यावर तो नॉनस्ट्रीकचा (Nonstick) तवा ठेवा. तवा बऱ्यापैकी गरम झाल्यावर त्यावर थोडं तेल टाकून ते पसरवून घ्या. त्याच्यावर आलं लसूण पेस्ट घालून चांगल्या प्रकारे परतवून घ्या. त्यानंतर मॅरीनेट केलेले पनीर आणि बाकीचे साहित्य पॅनवर ठेवा आणि साधारण ४ ते ५ मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्या.

कांदा, टोमॅटो, शिमला मिरची मऊ झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या. तुमच्याकडे तंदूर असेल तर तुम्ही पनीर, कांदा , टोमॅटो , शिमला मिरची आणि कांदा ग्रीलमध्ये ठेवून सर्व गोष्टी तळून घ्या. त्यानंतर मैदा रोटी वर तळलेले पनीरचे मिश्रण रोटीच्या एक चतुर्थांश भागात ठेवा आणि एका साईडने फिरवा. आश्याचपद्धतीने बाकीच्या रोट्यांमध्ये पनीरचे मिश्रण भरा. अश्याप्रकारे चमचमीत तंदूर पनीर रोल तयार होईल.

हे ही वाचा : 

क्रांती रेडकरने पतीवर लावलेले आरोप फेटाळून लावले, काय म्हणाली क्रांती

IPL2023, सुनील गावस्कर झाले कॅप्टन कूलचे फॅन, चेपॉकच्या मैदानात घेतली ऑटोग्राफ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss