Saturday, April 27, 2024

Latest Posts

जे जे रुग्णालयातील Dr Lahane यांच्यासह ९ वरिष्ठ डॉक्टरांनी दिले राजीनामे, नेत्र शल्यचिकित्सा विभाग बंद पडण्याच्या मार्गावर

जे जे रुग्णालयात विविध पदावर काम करणाऱ्या वरिष्ठ नी अचानक आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे या वरिष्ठ डॉक्टरांमध्ये गोरगरिबांसाठी मदत करणाऱ्या आणि मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी काम करणारे ज्येष्ठ डॉक्टर डॉ. तात्याराव लहाने (Tatyarao Lahane) यांनी देखील राजीनामा दिला आहे.

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या जे जे रुग्णालयामधून ही बातमी आली आहे. जे जे रुग्णालयात विविध पदावर काम करणाऱ्या वरिष्ठ नी अचानक आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे या वरिष्ठ डॉक्टरांमध्ये गोरगरिबांसाठी मदत करणाऱ्या आणि मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी काम करणारे ज्येष्ठ डॉक्टर डॉ. तात्याराव लहाने (Tatyarao Lahane) यांनी देखील राजीनामा दिला आहे. यामुळे जेजे रुग्णालयात (JJ Hospital) आता एकच खळबळ उडाली आहे.

डॉ. तात्याराव लहाने, रागिणी पारेख यांच्यासहित तब्बल ९ डॉक्टरांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व वरिष्ठ डॉक्टरांनी जे जे रुग्णालयाचे अधिष्ठातांवर गंभीर आरोप केले आहेत. जेजे रुग्णालयातील नेत्र शल्यचिकित्सा (Ophthalmology) विभागातील सर्वच म्हणजे नऊ अध्यापकांचे राजीनामे (Doctors Resign) दिले आहेत. सहा महिने आधी आलेल्या निवासी डॉक्टरांच्या (Mard Doctors) हट्टापायी डॉक्टरांनी हे पाऊल उचललं आहे, त्यामुळे जेजे रुग्णालयातील नेत्र शल्यचिकित्सक विभाग (Ophthalmology Department) बंद पडण्याच्या मार्गावर आला आहे. तसेच जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता आपल्याला वर्षभरापासून मानसिक त्रास देत असल्याची तक्रार राजीनामे देणाऱ्या सर्व वरिष्ठ डॉक्टरांची आहे. संबंधित प्रकार हा अतिशय धक्कादायक मानला जात आहे. यातील विशेष गोष्ट म्हणजे राजीनामा देणाऱ्या डॉक्टरांमध्ये तात्याराव लहाने यांचं नाव असल्याने हे प्रकरण गंभीर असण्याची शक्यता आहे.

तसेच जे जे रुग्णलयातील ज्येष्ठ डॉक्टरांनी या संदर्भात एक प्रसिद्ध पत्रक जारी करत राजीनामा देण्यामागील कारण सांगितलं आहे. राजीनामा देणाऱ्या लहाने आणि इतर ८ डॉक्टरांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून त्यात संपूर्ण घटनाक्रम मांडला आहे. निवासी डॉक्टर संघटना (मार्ड) कडून डॉ. तात्याराव लहाने (Tatyarao Lahane) आणि डॉ. पारेख यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती. राजीनाम्याच्या मागणीसाठी निवासी डॉक्टर संघटनेने (Mard Doctors) बुधवारपासून (31 मे) अनिश्चित काळासाठी संप पुकारला होता. सेवानिवृत्तीनंतरही काम करणाऱ्या तात्याराव लहाने यांचे वेतन अधिष्ठातांनी अदा केले नसून लहाने यांना शासकीय निवासस्थान रिक्त करायला सांगून ७ लाख रुपये दंड ठोठावला, अस पत्रकात म्हटलंय. निवासी डॉक्टरांना आमच्याविरोधात भडकावल जात असून त्यांना भडकवण्यात जे जे च्या डिन सहभागी असल्याचं तात्याराव लहाने यांनी म्हटलंय. वरिष्ठ डॉक्टरांनी प्रसिद्ध पत्रक काढत याबाबत सविस्तर भूमिका मांडली आहे.

हे ही वाचा : 

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री Vaibhavi Upadhyaya चा कार अपघातात मृत्यू

‘सामना’तून भाजपवर हल्लाबोल, जयंत पाटील यांनी….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss