Saturday, April 27, 2024

Latest Posts

Dr. Tatyarao Lahane यांनी का दिला राजीनामा?, वाचा सविस्तर!

डॉ. तात्याराव लहाने हे मोठे व्यक्तीमत्व आहे. डॉ. तात्याराव यांच नाव राज्याच्या लहान लहान गावांमध्ये पोहोचले आहे. लाखो दृष्टीहिनांना दृष्टी द्यायचे महान काम डॉ. तात्याराव लहाने यांनी केले आहे.

डॉ. तात्याराव लहाने हे मोठे व्यक्तीमत्व आहे. डॉ. तात्याराव यांच नाव राज्याच्या लहान लहान गावांमध्ये पोहोचले आहे. लाखो दृष्टीहिनांना दृष्टी द्यायचे महान काम डॉ. तात्याराव लहाने यांनी केले आहे. तसेच अनेक रुग्णाची सेवा यांनी केली आहे. डॉ. तात्याराव लहाने हे त्यांच्या चांगल्या कामांसाठी ओळखले जातात. यामुळे यांच्या कर्तृत्वाचं नेहमी कौतुक केलं जातं. विशेष बाब म्हणजे तात्याराव लहाने आपल्या रिटायरमेंट नंतर देखील जे जे रुग्णालयात आपले कर्तव्य बजावून रुग्णाची सेवा करत आहेत. डॉ. तात्याराव लहाने यांच्या फक्त नावामुळेच अनेक रुग्ण जे जे रुग्णालयात येतात. परंतु आज अचानक डॉ. तात्याराव लहाने सोबत अन्य ९ वरिष्ठ डॉक्टरांनी राजीनामा दिला. या गोष्टीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सविस्तर प्रसिद्ध पत्रक जारी करत या सर्वानी आपली भूमिका मांडली आहे. आता हे प्रकरण नेमके कोणते वळण घेतं हे पाहण्याचं ठरेल.

डॉ. तात्याराव लहाने व इतर ९ डॉक्टरांनी आपल्या प्रसिद्ध पत्रकात पुढील गोष्टी जाहीर केल्या आहेत-

गेल्या काही दिवसात आपण निवासी डॉक्टर संघटना यांनी पाठवलेले प्रेस रिलीज पाहीलेच असेल. नेत्र विभागातील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या निवासी डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीचे आम्ही शासनास मुद्देसूद उत्तर दिलेलं आहे. १९९५ पूर्वी दिवसाला फक्त ३० रुग्ण येणाऱ्या या विभागात आज ३०० ते ४०० रुग्ण दररोज येतात. या विभागाच्या कामाची दखल घेऊन केंद्र शासनाने २००८ मध्ये या विभागास ‘विभागीय नेत्रचिकित्सा संस्थेचा’ दर्जा दिला आहे. राज्याच्या अनेक भागांमधून इथे रुग्ण उपचारासाठी येतात. डोळ्यांमधील विविध गंभीर आजार किंवा शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंत निर्माण झालेले रुग्ण शेवटची अपेक्षा घेऊन आत्मविश्वासाने या विभागात उपचारासाठी येतात. या विभागात वेगेवेगळ्या विशेष सेवा दिल्या जातात. (उदा – मोतीबिंदु, काचबिंदु, मेडीकल आणि सर्जीकल रेटीना, बूबूळावरील शस्त्रक्रिया, लेसिक, लहान मुलांच्या डोळ्यावरील उपचार, तिरळेपणा, डोळ्यांचा कर्करोग, आकुलोपस्टी, सर्व प्रकारच्या तपासण्या) या सर्व सेवा त्या त्या तज्ज्ञांमार्फत रुग्णांना देणारा हा महाराष्ट्रातील एकमेव विभाग आहे. तसेच सुट्टीच्या दिवशी आदिवासी आणि ग्रामीण भागात जाऊन येथील नेत्रतज्ज्ञ गरीब रुग्णांची सेवा करत आहेत. मागील २८ वर्षात ६९२ शिबीरे घेऊन ३० लाख रुग्णांवर उपचार केले आहेत.

२०१६ मध्ये निवासी डॉक्टर संघटनेने या विभागाच्या विरोधात संप पुकारला होता. त्यातील १२ पैकी ११ डॉक्टरांनी क्षमा मागून तक्रार परत घेतली. त्यावेळेसही आमच्यावर झालेला अन्याय आम्ही रुग्णांसाठी सहन केला. आता पुन्हा २२ मे २०२३ ला सध्या कार्यरत असणाऱ्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या २८ निवासी डॉक्टरांनी अधिष्ठांकडे निवासी डॉक्टर संघटनेमार्फत तक्रार केली आहे. या तक्रारीचे स्पष्टीकरण डॉ. गजानन चव्हाण यांच्यासह अधिष्ठाता यांनी नेत्र विभाग प्रमुखांकडे मागितले. पण अधिष्ठाता यांनी विभागाचे स्पष्टीकरण पोहचण्यापूर्वीच चौकशी समिती नेमली. या समितीत ३१ मे ला सेवानिवृत्त होत असलेले डॉ. अशोक आनंद यांची चौकशी समिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. डॉ. अशोक आनंद यांची महिला छळ प्रकरणी डॉ. रागिनी पारेख यांनी यापूर्वी चौकशी केली आहे. तसेच त्यांनी डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ. भंडारवार, डॉ. एकनाथ पवार, डॉ. श्रीमती अभीचंदानी यांच्याविरुद्ध अट्रॉसिटी अंतर्गत पोलिसात तक्रार दाखल केली होती.

या वरुन हे लक्षात येते की डॉ. अशोक आनंद यांचे समितीचे अध्यक्ष म्हणून अधिष्ठाता यांनी केलेली नियुक्ती म्हणजेच विभागातील अध्यापकांना आकस बुद्धीने त्रास देण्यासाठी आणि त्यांची बदनामी केली आहे हे सिद्ध होत आहे. या विभागामार्फत डॉ. अशोक आनंद यांच्याऐवजी इतर कोणाताही अध्यक्ष नियुक्त करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. पण तसे न करता अधिष्ठाता यांनी चौकशी तशीच सुरु ठेवली.सहा महिन्यापूर्वी विभागात पदव्यूत्तर अभ्यासक्राम शिकवण्यासाठी रुजी झालेल्या निवासी डॉक्टरांच्या तक्रारीवरुन आमचे म्हणणे न ऐकताच चौकशी सुरु ठेवण्यात आली आहे. डॉ. लहाने हे मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र कार्यक्रम करीत आहेत. सेवानिवृत्तीनंतरही ते आणि सर्व अध्यापक रात्रं-दिवस रुग्णसेवा देत आहेत. असे असले तरी त्यांचे वेतन अद्यापही अधिष्ठाता यांनी अदा केलेले नाही. त्यांना शासकीय निवासस्थानासाठी ७ लाख रुपये दंड लावून रिक्त करण्यास सांगितले. तरिही रुग्णांशी असलेल्या बांधिलकीमुळे ते काम करीत आहेत.

हे ही वाचा:

सरकारने संबंधित वेबसाईटवर कारवाईचे आदेश दिले असले तरी…, जयंत पाटील

लग्न कधी आहे? या प्रश्नावर Parineeti Chopra ने दिली प्रतिक्रिया…

Jejuri मध्ये देवस्थानच्या विश्वस्तपदाचा वाद आणखी पेटला, ग्रामस्थ घेणार लवकरच Raj Thakrey यांची भेट!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss