Saturday, April 27, 2024

Latest Posts

२०१९ च्या निवडणुकीचा बदला घेण्यासाठी आढळराव पाटील निवडणूक लढत आहेत – अमोल कोल्हे

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांचा (Shivajirao Adhalrao Patil) निवडणुकीत पराभव केला होता.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांचा (Shivajirao Adhalrao Patil) निवडणुकीत पराभव केला होता. गेल्या वेळचा बदला घेण्यासाठी आपण निवडणुकीला उभे राहिला आहात. याची १०० टक्के खात्री आहे. ही निवडणूक सर्व रेकॉर्ड तोडणारी आहे, असे शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले होते. त्यावर खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, २०१९ च्या निवडणुकीचा बदला घेण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणूक लढणार असतील तर एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने लोकसभेत जाऊच नये का? का फक्त परदेशात कंपन्या असणाऱ्यांच्याच माणसाला लोकसभेत जाण्याचा अधिकार आहे? असा प्रश्न खासदार अमोल कोल्हेंनी उपस्थित केला आहे. निवडणुकीला सामोरे जाण्याचा कोणाचा काय हेतू आहे. त्यांचे विधान पाहिले तर त्यांना २०१९ चा बदला घ्यायचा आहे. मला मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य नागरिकांचा, महाराष्ट्रातील जनतेचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज हा दिल्लीत घुमत राहावा यासाठी मायबाप जनतेकडे मी आशिर्वाद मागतोय. त्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे. त्यांना जर बदला वाटत असेल तर मायबाप जनता सुज्ञ आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत मनसे आणि भाजपा युती होणार हे निश्चित झाले आहे. यावर अमोल कोल्हे यांना विचारल्यानंतर ते म्हणाले, कोणी महायुतीत जाणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण यापद्धतीने जे प्रकार सुरु आहेत. त्यामध्ये भाजपचा कॉन्फिडन्स खचलेला दिसतोय. अब की बार ४०० पार म्हणणं असताना जेमतेम ते २०० चा आकडा ते गाठू शकतील, अशी वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्राची भूमिका ही फार महत्वाची राहणार आहे. एकीकडे शिवसेना फोडून झाली, राष्ट्रवादी फोडून झाली तरी सुद्धा मनसेला बरोबर घेताय, तरी सुद्धा परिस्थिती भाजपला फेव्हरेबल परिस्थिती नाहीये. महाराष्ट्र हा कायम विचारांच्या मागे उभा राहिला आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा येत्या निवडणुकीत नक्की दिसेल,असे अमोल कोल्हे म्हणाले.

हे ही वाचा:

७ मे ला कोकणात रंगणार भारत – पाकिस्तान, राणेंच्या उमेदवारीची अनेक समीकरणं ठाकरेंना फायद्याची

ठाकरेंच्या हालचालींना वेग; कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंच्या विरोधात केदार दिघे अशी लढत होण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss