Tuesday, May 7, 2024

Latest Posts

SUPRIYA SULE & AJIT PAWAR: आमच्यात राजकीय मतभेद आहेत

दरम्यान, शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने डॉक्टरांनी सांगितले आहे की ते घरी लोकांना भेटू शकतात पण प्रवास टाळण्यात यावा त्यामुळे आज उद्या आणि परवा ते घरी सगळ्यांना भेटणार आहेत फक्त प्रवास करणार नाहीत, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

शरद पवार यांच्या बारामती येथील घरात साजऱ्या होणाऱ्या दिवाळीकडे सर्वांचं लक्ष असतं. राष्ट्रवादीतील फुटीनंतर होणाऱ्या या वर्षीच्या पवार यांच्या दिवाळीमध्ये अजित पवार सहभागी होतील की नाही? याबाबतची उत्सुकता सर्वांना लागली आहे. शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र दिसले. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना अजितदादा आपल्या बहिणीला दिवाळीचं काय गिफ्ट देणार या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी आपले मत मांडले आहे.आमच्यात राजकीय मतभेद आहेत, पण ते मतभेद आम्ही कुटुंबामध्ये आणत नाही. आमची लढाई ही वैचारिक आहे, व्यक्तिगत नाही अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. तर यंदाच्या दिवाळी दादा आपल्या बहिणीला काय गिफ्ट देणार हे मला काय माहिती? दादालाच विचारा काय गिफ्ट देणार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बारामतीतील एका कार्यक्रमांमध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच स्टेजवर दिसले. त्याआधी प्रतापराव पवारांच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली होती. आता दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सर्व पवार कुटुंबीय एकत्र येणार आहेत. त्यामध्ये अजित पवार सहभागी होतील की नाही असा प्रश्न विचारल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमचे वैचारिक मतभेद आहेत पण मनभेद नाहीत. जेव्हा आपले वय वाढते तेव्हा वैचारिक प्रगल्भता वाढली पाहिजे. आमची लढाई वैचारिक आहे, व्यक्तिगत नाही. राजकीय मतभेद आहेत पण भाजपच्या अनेक नेत्यांशी आमचे चांगले संबंध आहेत. दादा कार्यक्रमात मास्क लावून बसले होते. त्यामुळे त्यांना भेटण्याची मुभा आहे की नाही हे डॉक्टर ठरवतील. तुम्हा सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद हे शरद पवारांचे टॉनिक आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं.

शरद पवार यांचा ओबीसी असल्याचा एक दाखला सध्या वायरल होत आहे त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की जो दाखला दाखवला जातोय तो इंग्लिशमध्ये आहे, पवार साहेब ज्यावेळी शाळेत होते तेव्हा इंग्लिश असू शकतं का? हे सगळे हास्यास्पद आहे हा बालिशपणा सुरू आहे. खोटी सर्टिफिकेट आजकाल मार्केटमध्ये कोणीही बनवू शकतो. दरम्यान, शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने डॉक्टरांनी सांगितले आहे की ते घरी लोकांना भेटू शकतात पण प्रवास टाळण्यात यावा त्यामुळे आज उद्या आणि परवा ते घरी सगळ्यांना भेटणार आहेत फक्त प्रवास करणार नाहीत, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

हे ही वाचा : 

प्रार्थना बेहेरेने शेअर केला चार जणांचा व्हिडिओ,प्रार्थना म्हणते  ‘हीच माझी दिवाळी’

MAHARASHTRA: शरद पवारांना भेटायला नागरिकांची गर्दी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss