Monday, May 6, 2024

Latest Posts

सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्याची देखील हवेची गुणवत्ता खालावली; निर्देशांक १६१ पार

सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्याची देखील हवेची गुणवत्ता खालावली; निर्देशांक १६१ पार

महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील प्रदूषणात कमालीची वाढ झाल्याचं या दिवसात पाहायला मिळत आहे. मुंबईतील वाढत असलेलं हवा प्रदूषण सध्या मुंबईकर व राज्य सरकारसाठी चिंतेचा विषय बनला आहे. आता मुंबई पाठोपाठ विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहराची देखील हवा बिघडली आहे. उत्तम वातावरणासाठी ओळखलं जाणारं पुणे शहर आता हवेच्या गुणवत्तेबाबत दिल्ली आणि मुंबईच्या बाजूला जाऊन बसलं आहे. पुण्यानं चक्क दिल्ली आणि मुंबईलाही हवेच्या गुणवत्ता बाबत मागे टाकलेलं आहे. मुंबई आणि दिल्ली या शहरांपेक्षा पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावल्याचं चित्र बघायला मिळत आहे.

मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक १४५ वर असून पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक हा १६१ वर आहे. पुण्यातील गजबजलेल्या परिसरांपैकी एक असलेल्या शिवाजीनगर परिसरातील एक्यूआय (AQI) वाईट श्रेणीत असून हवा गुणवत्ता पातळी २७१ वर तर भुमकर चौकातील एक्यूआय (AQI) २६० वर आहे. पुण्यातील कात्रज आणि पाषाणचा परिसर सोडता सर्वत्र हवा गुणवत्ता पातळी मॉडरेट (Moderate) श्रेणीत आहेत. तसेच, हिवाळ्यात मागील चार वर्षात मुंबईची हवा गुणवत्ता दिल्लीपेक्षाही वाईट स्थितीत असल्याचे अनेक संस्थांचा अभ्यासातून बघायला मिळालेलं आहे. दरम्यान, मुंबई व पुणे या दोन्ही शहरांच्या हवेची गुणवत्ता देखील खालावत चालली आहे. पर्यावरणाशी निगडित अनेक कायदे असूनही त्यांचं काटेकोरपणे पालन केलं जात नाही. पुणे व मुंबई सारख्या मोठया शहरांमध्ये सुरू असलेले छोटे- मोठे प्रकल्प, इथली वाहतूक व्यवस्था या सगळ्यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. हे वाढतं प्रदूषण रोखण्याचं मोठं आव्हान प्रशासन आणि नागरिकांसमोर आहे.

आरोग्य विभागाकडून प्रदूषणापासून काळजी घेण्याचं आवाहन

मुंबईच्या प्रदूषणात कमालीची वाढ पाहायला मिळालीये. मुंबईतील वाढते हवा प्रदूषण सध्या सर्वांचाच चिंतेचा विषय झाला आहे मुंबईतील प्रदूषणास धूलीकण, वाहनांची वाढती संख्या,नवं नवीन बांधकाम, कारणीभूत आहेत. दरम्यान राज्य आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन यादरम्यान करण्यात आलं आहे.

हे ही वाचा : 

आजचे राशिभविष्य,७ नोव्हेंबर २०२३; तुमच्यापैकी काही जण…

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भारत-पाकिस्तान सीमेवर शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे होणार अनावरण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss