Sunday, April 28, 2024

Latest Posts

महाराष्ट्राच्या राजकारणाचा रंग भगवा – Dr. Shrikant Shinde

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीमधील होळीच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती. कल्याण पूर्वेकडील एका कार्यक्रमात माध्यमांनी श्रीकांत शिंदे यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा रंग कोणता असेल असा प्रश्न विचारला असता त्यांनी भगवा असेल असे उत्तर दिले.

कल्याण पूर्व येथे श्रीराम सेवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फगुआ महोत्सवाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते. होळी सणाच्या निमित्ताने उत्तर भारतीय बांधवांच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या या उत्सवाची एक अनोखी परंपरा आहे. संगीत कार्यक्रम या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली. तसेच, या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या संगीत कार्यक्रमाचा आनंद घेत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व बांधवांना होळी आणि धुलिवंदनाच्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड, श्रीराम सेवा समितीचे सुनील मिश्रा, योगेश मिश्रा, विवेक त्रिवेदी तसेच संयोजक प्रतीक तिवारी, संजय मिश्रा यांच्यासह विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे शहरातील किसन नगर येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कुटुंबासोबत पूजा करून होलिकादहन केले. सर्वांच्या आयुष्यातील दुःख, वेदना या पवित्र अग्नीत नष्ट होऊन सर्वांना सुख समाधानाचे आयुष्य लाभो अशी प्रार्थना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे केली. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

हे ही वाचा:

झुंडशाही,पवार पर्व संपवण्यासाठी आपली लढाई – विजय शिवतारे

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा एक उमेदवार जाहीर केल्यानंतर पंकजा मुंडेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss