Saturday, April 27, 2024

Latest Posts

बीडकरांचं प्रेम जनतेची सेवा करण्यासाठी ऊर्जा देणारं – Pankaja Munde

श्री क्षेत्र नारायणगड येथे पंकज मुंडे यांनी नगदनारायण महाराजांचे दर्शन घेतले. नारायणगडाचे दर्शन आणि महाराजांचे आशीर्वाद नेहमीच अतुलनीय ऊर्जा देणारे असतात, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या बीड शहरातील कार्यालयाला भेट देऊन उपस्थित शिवसैनिक आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांशी पंकजा मुंडे यांनी संवाद साधला.
जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या शिवाजीराव पंडित यांच्यासारख्या मार्गदर्शक व्यक्तीचे लोकसभा निवडणुकीच्या काळात आशीर्वाद लाभने ऊर्जादायी असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
नारायणगडाच्या वतीने महाराजांनी पंकजा मुंडे यांना सन्मान करून आशीर्वाद दिले.
पंकजा मुंडे यांनी गहिनीनाथगड आणि सावरगाव घाट येथील कार्यक्रम आटोपून बीडकडे जाताना कूसळंब येथील प्रसिद्ध खंडेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन प्रार्थना केली, याप्रसंगी ग्रामस्थांनी केलेला सन्मान स्वीकारून त्यांच्याशी संवाद साधला.
महायुतीची उमेदवार म्हणून जिल्ह्यात आल्यानंतर बीडकरांनी दिलेले प्रेम मला पुढील काळात जनतेची सेवा करण्यासाठी ऊर्जा देणारे असल्याचे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

Latest Posts

Don't Miss