Saturday, April 27, 2024

Latest Posts

मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत बच्चू कडू यांनी केली खोचक टोला

मंत्रिमंडळ केल्यावर नाराज असलेले लोक पक्ष सोडून जातील असे काही नाही. विस्तार केल्यावर जातील किंवा नाही केला म्हणून राहतील असा काही विषय नाही. काही टेक्निकल कारण होते. न्यायालयाचे कारण होते. मात्र आता काही कारण राहिले नाही, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. काल देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे की, आम्ही मंत्रिमंडळ विस्तार लगेच करणार आहे. पण लगेच म्हणजे काय मला काही समजत नाही, असा खोचक टोलाही बच्चू कडू यांनी यावेळी लगावला. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रिमंडळाच्या चर्चा रंगू लागल्या असून, यावर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहे. पण प्रत्यक्षात मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची (Maharashtra Cabinet Expansion) चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र हा विस्तार कधी होणार याबाबत शिक्कामोर्तब मात्र काही होत नसल्याने इच्छुकांचा हिरमोड होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या आहे. न्यायालयाच्या तारखांपेक्षा मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा जास्त झाल्या असल्याचं बच्चू कडू म्हणाले. पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “जनतेसाठी देखील हा निर्णय घेतला पाहिजे. आपण जर पाहिले एका मंत्र्याकडे चार-चार जिल्ह्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी आहे. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबूल केले आहे की हा सर्व भार जास्त होत असून, विस्ताराची गरज आहे.” त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची अपेक्षा असल्याचं बच्चू कडू म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळाच्या अनेक तारखा झाल्या आहेत. एवढंच नाही तर न्यायालयाच्या तारखांपेक्षा मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा जास्त झाल्या आहेत. दोन महिने झाले की, माध्यमांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या पाहायला मिळतात. त्यानंतर आम्हाला अनेक अभिनंदनाचे फोन आले. त्यामुळे एकदाची काय ती भानगड मिटवून टाकली पाहिजे. सरकारने स्पष्टपणे मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्यास तसे सांगितले पाहिजे. त्यामुळे कोणाची नाराजी राहणार नाही. पण विस्तार करायचा असल्यास एक घाव दोन तुकडे करून टाकले पाहिजे. तर जेवणाचे आमंत्रण दिले जाते पण जेवणाराच गायब राहते, असे होऊ नयेत.”

हे ही वाचा:

सिडनीतून आपल्या सरकारबद्दल काय म्हणाले नरेंद्र मोदी …

महाविकास आघाडी एकजूटीने राहणार, मी तुम्हाला स्टँपपेपरवर लिहून देतो, अजित पवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss