Sunday, June 4, 2023

Latest Posts

Rahul Gandhi यांची छत्रपती शिवरायांशी तुलना करणारा व्हिडीओ चर्चेत, भाजपने केला संताप व्यक्त

सध्या काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हे पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहेत. याच कारण म्हणजे काँग्रेसनं (Congress) पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकॉऊंटवर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे.

सध्या काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हे पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहेत. याच कारण म्हणजे काँग्रेसनं (Congress) पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकॉऊंटवर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. तसेच या व्हिडीओसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरचं गाणं लावलं आहे. तर आता या व्हिडिओ वरून राजकीय वातावरण हे पुन्हा एकदा चांगलंच तापलं आहे. कारण भारतीय जनता पार्टीने या व्हिडिओवर चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

काँग्रेसच्या ट्विटर अकाउंट वरून राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे आणि या सोबत छत्रपती शिवाजी महाराज यांचं गाणे लावण्यात आले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी (chhatrapati shivaji maharaj) केल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीने केला आहे. काँग्रेस पक्षाने केलेल्या या ट्विटवर भाजपनं आक्षेप घेतला आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा व्हिडिओ तात्काळ डिलीट करावा अशी मागणी देखील केले आहे. आणि त्याच सोबत ते पुढे म्हणाले आहेत की, काँग्रेसनं महाराष्ट्राची माफी मागावी. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण हे चालुच तापण्याची शक्यता देखील आहे. तसेच बावनकुळे पुढे म्हणाले आहेत की, काँग्रेसने महाराष्ट्र आणि देशाची माफी मागितली पाहिजे. राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे हे वेदनादायक आहे. हा व्हिडीओ डिलीट केला पाहिजे. जर व्हिडिओ डिलीट केला नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या व्हिडिओ आक्षेप घेतल्यांनंतर काँग्रेस कडून देखील प्रतिउत्तर देण्यात आलं आहे. राहुल गांधींच्या व्हिडीओचा सत्ताधारी चुकीचा अर्थ काढत आहेत असे म्हणत नाना पटोलेंनी भाजपला प्रत्युत्तर दिलंय. तर पुढे नाना पटोलेंनी भाजपवर देखील हल्लाबोल हा केला आहे. कोश्यारींनी शिवरायांचा अपमान केला तेव्हा भाजप गप्प का होती? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपाने नाहक आरोप करणे बंद करावे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्यांनी जनतेची माफी मागितलेली नाही, या शब्दांत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला.

हे ही वाचा : 

बर्थडे बॉयला Gautami Patil चा कार्यक्रम ठेवणं पडलं महागात

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री Vaibhavi Upadhyaya चा कार अपघातात मृत्यू

‘सामना’तून भाजपवर हल्लाबोल, जयंत पाटील यांनी….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss