Tuesday, April 30, 2024

Latest Posts

आणखी एका BJP नेत्याचे संविधान बदलण्याचे वक्तव्य, Jitendra Awhad यांनी दिले चोख प्रत्युत्तर

आगामी लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election 2024) बिगुल देशभरात वाजले असून सर्वच पक्षांच्या प्रचारसभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) ‘अब कि बार, ४०० पार’ चा नारा देत यावेळी ४०० हुन अधिक जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भाजपच्या काही नेत्यांनी ‘संविधान बदलण्यासाठी भाजपला ४०० हुन अधिक जागा जिंकाव्या लागतील’ अशी वक्तव्ये केली होती. हाच धागा पकडून काँग्रेस (Congress) आणि इंडिया आघाडीने (INDIA Alliance) भाजपवर संविधान बदलण्याविषयीचे आरोप केले होते. पंतप्रधान मोदींसह (PM Narendra Modi) भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी या आरोपांचे खंडन करत संविधान कुणीही बदलू शकत नाहीत, असे प्रतिपादन केले होते.

आता पुन्हा भाजपचे मेरठ येथील लोकसभा उमेदवार अरुण गोविल (Arun Govil) यांनी संविधान बदलाविषयीच्या चर्चांवर मोठे वक्तव्य केले आहे. “संविधानाने ठराविक कालावधीत बदल पाहिले आहेत. बदल हे विकासाचे लक्षण आहे. ही वाईट गोष्ट नाही. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती; सध्याची परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे बदल करायचे असतील तर… संविधान एका व्यक्तीच्या हेतूने बदलत नाही, ते सर्वांच्या सहमतीने बदलले जाऊ शकते.” अरुण गोविल हे प्रसिद्ध अभिनेते असून रामानंद सागर यांच्या सुप्रसिद्ध ‘रामायण’ या टीव्ही मालिकेत श्रीरामाची भूमिका साकारली होती.

याआधीही भाजपच्या नेत्यांनी संविधान बदलाची वक्तव्ये केली होती. भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे (Anantkumar Hegade) यांनी ‘संविधान बदलण्यासाठी भाजपला ४०० हुन अधिक जाग हव्यात,’ असे विधान केले होते. त्याचाच कित्ता गिरवत भाजप नेत्या ज्योती मिरधा (jyoti Mirdha), खासदार लल्लू सिंग (Lallu Singh) यांनीदेखील बहुमताने सत्तेत आल्यास संविधान बदलण्याचे वक्तव्य केले होते.

संविधान बदलण्यावरून जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी यावरून ट्विट करत भाजपवर आगपाखड केली आहे. ते म्हणाले, “आतापर्यंत भाजपच्या पाच उमेदवारांनी आपल्या प्रचार करताना, ‘आम्हाला संविधान बदलण्यासाठी जास्त जागांवर विजयी करा,’ असे म्हटले आहे. म्हणजेच, यांच्या मनात काय आहे हे स्पष्ट होत आहे. यांना ४०० जागा याचसाठी हव्या आहेत की, यांना संविधान बदलायचे आहे, आम्हीही तेच म्हणत आहोत. बुरसटलेल्या विचारांचे हे मनुवादी भारताला आजही पाच हजार वर्ष मागे घेऊ जाऊ इच्छितात.”

ते पुढे म्हणाले, “केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे पती परकाला प्रभाकर यांनी आपल्या मुलाखतीत बरोबर सांगितले आहे की, “प्राचीन भारतात घेऊन जाणारा हा सत्ताधारी पक्ष आहे.” भाजपच्या प्रमुख मंत्र्यांचे पती जेव्हा अशी वाक्ये बोलतात; तेव्हा खासगीत त्यांची पत्नी त्यांना काहीतरी सांगतच असणार ना! त्यामुळे स्पष्ट होतंय की, संविधान बदलणं ही एकमेव गॅरंटी सध्या दिली जात आहे.”

हे ही वाचा:

लढाई फक्त VBA आणि BJP मध्ये, Prakash Ambedkar यांचे कार्यकर्त्यांना पत्र

Nitin Gadkari यांच्यासारखा भ्रष्टाचारी संपूर्ण महाराष्ट्रात नाही, Congress नेत्याचे गंभीर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss