Wednesday, June 7, 2023

Latest Posts

मोदी सरकारकडून अर्थव्यवस्थेचा केला जातोय खेळखंडोबा – संजय राऊत

मोदी सरकार नवीन काही तरी योजना ह्या राबवतच असतो. नोटा बंदी, थाळी वाजवणे, टाळ्या वाजाबवणे, त्यांनतर अजून हि सरकारी योजना राबवल्या जातात. मात्र या योजना राबवल्या जात असताना या मध्ये जनतेचा किती विचार केला जातो यामध्ये काही तथ्यच नाही. मोदी सरकारने कोरोना काळाच्या आधी नोट बंदी जाहीर केली.

मोदी सरकार नवीन काही तरी योजना ह्या राबवतच असतो. नोटा बंदी, थाळी वाजवणे, टाळ्या वाजाबवणे, त्यांनतर अजून हि सरकारी योजना राबवल्या जातात. मात्र या योजना राबवल्या जात असताना या मध्ये जनतेचा किती विचार केला जातो यामध्ये काही तथ्यच नाही. मोदी सरकारने कोरोना काळाच्या आधी नोट बंदी जाहीर केली. या नोट बंदी मध्ये प्रामुख्याने १००० रु. नोटांचा समावेश कारणात आला आहोत. नोट बंदी जाहीर केल्यानंतर सामान्य जनतेमध्ये घाबरल्याचे वातावरण बघायला मिळत होते. सामान्य जनतेच्या डोक्यावरून हा नोट बंदीचा विषय जात होता. कारण चलनात असणारो नोट अचानक बंद केल्यामुळे सामान्य जनता हि संभ्रमात पडली होती. काही दिवसांनी रिझर्व बँकेकडून २००० रु. नोट चलनात आणली गेली. जी नोट सामान्य जनतेच्या कमी पडत नव्हती. कारण सगळ्याच सामान्य जनतेकडे २००० रु. नोट ही चलनात वापरली देखील जात नव्हती.कोरोना काळ सुरु झाला आणि सगळेच व्यवहार अचानक ठप्प झाले.

गाजावाजा करुन दोन हजारांची नोट मोदी सरकारने चलनात आणली. मात्र या २००० रु. चलनेत सामान्य जनतेला त्याचा काहीच फायदा झाला नाही. कारण सामान्य जनता म्हणजे आपण म्हणून शकतो, राष्टावर भाजीपाला, फळ विक्रेते, फुल विक्रेते या सरखूया लोकांकडे २००० रु. दिल्यानंतर त्यांच्या कडे देखील सुट्टे पैसे देण्याचा अडथळा निर्माण होयचा. मात्र आता मोदी सरकारने पुन्हा एकदा न बंदी केली आहे. चलनात असलेली २००० रु. नोट आता बंद केली आहे. या नोट बंदीसंबंधी संजय राऊत यांनी सरकारवर भाष्य केले आहे. मोदी सरकारचा अर्थव्यवस्थेशी खेळखंडोबा सुरु आहे अस संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेत याविषयी बोलत असताना मोदी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.

८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या. त्यांच्या जागी नवीन ५०० आणि २००० च्या नव्या नोटा बाजारात आणण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर २०१६ मध्ये २ हजारांची नोट बाजारात आली होती. आरबीआयने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार २०१९ पासून २ हजारांच्या नोटांची छपाई बंद केली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी दोन हजार रुपयांची नोट वितरणातून काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत आपल्याकडच्या दोन हजारांच्या नोटा बँकेतून बदलून घेता येणार आहेत. अशी मोठी माहिती देण्यात आली. आता त्यामुळेच बँकेच्या बाहेर सामन्यानाच्या रांगच रांगा बघायला मिळणार आहे. त्याच प्रमाणे बँकेच्या कामात देखील भर पडणार आहे/ यात काही शंकाच नाही. य्यामुळे बँक कर्मचारी हे काही अंशी संतापलेल्या अवस्थेत दिसणार आहे.

तसेच संजय राऊत याना नांदेड मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान महाविकास आघाडीच्या मतभेदांवर विचारले असता, महाविकास आघाडीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. लोकसभा निवडणुका या महाविकास आघाडीच्या वज्रमुठीनेच लढल्या जातील असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. कुणी काहीही म्हणू द्या. बेकायदेशीर सरकारने काहीही म्हणू देत. आम्ही एकत्र राहूनच घटनाबाह्य सरकारला बाहेरचा रस्ता दाखवू असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर संजय राऊत यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरही भाष्य केलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला तर तो पूर्णपणे बेकायदेशीर असेल. कारण हे सरकारच बेकायदेशीर आहे. अद्याप सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यायचा आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : 

कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरमय्या,उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार घेणार शपथ

संजय राऊतांच्या स्वागताची बीडमध्ये जोरदार तयारी सुरु

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss