Friday, April 26, 2024

Latest Posts

Time Maharashtra Exclusive, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस कसं मांडणार मुंबईत यशाचं गणित?, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले Suresh Koparkar

काँग्रेस नेते सुरेश कोपरकर आणि भाजप नेते मिलिंद पाटणकर यांची विशेष मुलाखत ही टाईम महाराष्ट्र तर्फे घेण्यात आली आहे. यावेळी 'भाजप शिवसेनेसह काँग्रेसचे नेतेही परेशान पालिकांवर प्रशासक' या मुख्य मुद्द्याला अधोरेखित करून ही संपूर्ण मुलाखत घेण्यात आली आहे.

सध्या मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील इतर महानगर पालिकांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष हे लागले आहे. अर्थात पालिका निवडणुकांचा मुहूर्त कधी असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिनांक २० मे २०२३ रोजी काँग्रेस नेते सुरेश कोपरकर आणि भाजप नेते मिलिंद पाटणकर यांची विशेष मुलाखत ही टाईम महाराष्ट्र तर्फे घेण्यात आली आहे. यावेळी ‘भाजप शिवसेनेसह काँग्रेसचे नेतेही परेशान पालिकांवर प्रशासक’ या मुख्य मुद्द्याला अधोरेखित करून ही संपूर्ण मुलाखत घेण्यात आली आहे. टाईम महाराष्ट्र चे मुख्य संपादक राजेश कोचरेकर यांनी ही खास मुलाखत घेतली आहे. तसेच या मुलाखतीत अनेक मुद्यांना अधोरेखित करण्यात आले आहे.

नगरसेवक हा प्रत्येक माणसांशी जुळलेला आणि जोडला गेलेला घटक आहे. परंतु आता नगरसेवकच काहीसा भरडला जात आहे. म्हणूनच टाईम महाराष्ट्र ने गेले ५ वर्षे मुंबई महानगरपालिकेत निवडून आलेले काँग्रेस नेते सुरेश कोपरकर यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. यावेळी बोलताना काँग्रेस नेते सुरेश कोपरकर म्हणाले आहेत की, जनमानसाच्या तळागाळातील कामे लोकांसाठी केली की साहजिकपणे नागरिकच बोलतात की हे पुन्हा निवडून आले पाहिजेत. लोकांसाठी जी येतील ती कामे केली आहेत. उदा. कोणता फंड आणायचा… आमचा याच सर्व कामाचा मोबदला आम्हाला सतत यामधून मिळाला आहे. लोकांच्या कामासाठी जो निधी लागतो तो निधी आम्हाला वज्रमुठीच्या माध्यमातून मिळू शकतो आणि त्यामुळे लोकांना आम्ही त्या सुविधा देऊ शकतो. जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्याकडे जास्त फंड हा उपलब्ध होत असतो परंतु विरोधकांना फंड हा कमी मिळतो. त्यासाठी नाईलाजाने वज्रमुठीला सहकार्य करून त्याच्या माध्यमातून नगरसेवकांची देखील संख्यात कशी वाढ होईल किंवा एकला चालो ने देखील आमची संख्या ही वाढू शकते असे सुरेश कोपरकर म्हणाले आहेत.

तसेच सुरेश कोपरकर पुढे म्हणाले आहेत की, प्रत्येक प्रतिनिधी हा पक्षाच्या नावाखाली प्रथमतः निवडून येत असतो. आणि नंतर दुसरी, तिसरी वेळ हा त्यांच्या कामाखाली निवडून येत असतो. पहिल्यावेळी पक्षाचं नाव असत पण काम जर केले नाही तर तो माणूस पुन्हा निवडणून येत नाही. २५ वर्ष जेव्हा निवडून येतात तेव्हा लोकांना त्यांची काम होत आहेत हे समजते म्हणून ही गोष्ट घडू शकते. तसेच नगरसेवक या पदासाठी आम्हीच राहावे असं नाही कारण आम्ही स्वतःहून सांगतो आम्हाला नको पण तेव्हा काँग्रेसची श्रेष्ठी किंवा नागरिक हे स्वतःहून सांगता आमहाला तुम्हीच हवे आहात असे कोपरकर म्हणाले आहेत. तसेच ते पुढे मिलिंद पाटणकर यांच्या उत्तरावर सुरेश कोपरकर थोडे आक्रमक होताना दिसले आहे. तेव्हा ते कोपरकर म्हणाले महानगरपालिकेत काँग्रेस हा विरोधातच होता. महाविकास आघाडी ही राज्यामध्ये होती. काँग्रेसकडे जे नगरसेवक होते ते त्यांना पुरुन उरणारे होते. जर श्रेष्ठीनी आदेश दिला तर आम्हाला जावंच लागेल एकत्र. श्रेष्ठीच्या पुढे आम्ही नाहीत.

सतत निवडणूक या पुढे धाकल्या जात आहेत त्याचा तुमच्या सारख्या जेष्ठ नगरसेवकांना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागतो? असा प्रश्न विचारला असता सुरेश कोपरकर म्हणाले आहेत की, मुंबई महानगर पालिकेची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत इतके वर्ष, इतके म्हणे कधी प्रशासन बसला न्हवते आणि हा घातक विषय आहे. तळागाळातील काम हे लोकप्रतिनिधीशिवाय होतच नाही. आमदार खासदार यांच्याकडे लोक जातच नाहीत. ते लोकांना भेट सुद्धा नाहीत. पण स्थानिक नगरसेवकांना प्रत्येक कामासाठी लागणार निधी ते कुठून आणणार? आता दिड वर्ष होत आलं कोणत्याच नगरसेवकाला काम करण्याचा अधिकार नाही त्यांना सही कर्णाचा अधिकार नाही तरी लोक लाईन लावतात. मुळात तुम्ही नगरसेवक नाहीत हे त्यांना माहीतच नाही. मग ही मोठी समस्या आहे.

तसेच कोपरकर पुढे म्हणाले आहेत की, मिलिंद पाटणकर यांनी सांगितलं रस्त्यासाठी निधी आला तो अजून दप्तरातच आहे अजून तो उरलाच नाही आहे. तसेच कोपरकर पुढे म्हणाले आहेत कि, सत्ताधाऱ्यांमध्ये ते आहेत म्हणून त्याचं ऐकत असतील आणि त्यांना कदाचित फंड हा मिळत असेल. तसेच ते पुढे म्हणाले सध्या हाऊस बंद आहे आणि त्यामुळे खालचे अधिकारी वरचे अधिकारी हे मस्तावल्या सारखे झाले आहेत. मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना देखील पात्र दिले आहे की मला निधी हा उपलब्ध करून द्या. मुख्यमंत्री, आमदार खासदार, राज्यसभा विधानसभांचे परिषद त्यांच्याकडे देखील फंड मागितले आहेत. कारण फंड नसेल तर मी लोकांची काम ही करू शकत नाही.

तसेच कोपरकर पुढे म्हणाले आता शिवसेने सोबत ही एक सुवर्णसंधी किंवा काम करण्याची एक संधी आहे असं देखील म्हणता येईल. तसेच कोपरकर याना पुढे विचारण्यात आले कि उद्धव ठाकरेंमुळे तुम्हाला भरभराटीचे दिसू हे येणार आहेत आहे का ? यासंदर्भात बोल्ट असताना कोपरकर म्हणाले, काँग्रेस वाले आहे म्हणून मी असं म्हणणार नाही. उद्धव ठाकरेंना दिवस चांगले येतील म्हणून काँग्रेस ला दिवस चांगले येतील असं नाही आहे. कारण काँग्रेस पूर्वीही होती आताही आहे आणि उद्याही असणार आहे असं देखील काँग्रेस नेते सुरेश कोपरकर म्हणाले आहेत.

हे ही वाचा :

सीबीआयच्या पाच तासाच्या चौकशी नंतर, वानखेडे होणार का निलंबित?

सरकारला पुन्हा ५०० आणि १००० च्या नोटा चलनात आणाव्या लागणार, डॉ. भालचंद्र मुणगेकर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss