Sunday, April 28, 2024

Latest Posts

आंबेडकरांनी आमच्यासोबत असावं कारण…काय म्हणाले Sanjay Raut?

खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. आता लोकशाहीचाच रंग उधळला जाईल. या देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये अहंकार आला. मात्र, देशातील जनतेने लोकशाही वाचविण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीने त्यांच्या हातात पोलीस यंत्रणा आहेत. ज्याप्रमाणे केजरीवाल यांना अटक झाली. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री सोरेन यांना अटक झाली, ज्याप्रमाणे सर्व विरोधकांवरती अटकेची टांगती तलवार आहे असे सांगत लोक फार सहन करणार नाहीत, असे संजय राऊत यांनी सांगितले.

अरविंद केजरीवाल यांना अटक करतात. दिल्लीमध्ये, सर्व देशामध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. जगातल्या ज्या भागात हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केला, तेथे लोक रस्त्यावर आले. हुकूमशाहांना लोकांनी रस्त्यावर मारलं किंवा त्यांना देश सोडून जावं लागलं. आता ती वेळ आपल्या देशात आली असल्याचं संजय राऊत म्हणाले. उमर अब्दुल्ला यांनी विरोध केला असं मला वाटत नाही. उमर अब्दुल्ला हे महाराष्ट्रामध्ये शिकलेले आहेत. जेव्हा काश्मीरमधील वाद विकोपाला गेला तेव्हा काश्मीरमधील अनेक विद्यार्थी महाराष्ट्रात शिकत होते. त्यामुळे उमर अब्दुल्ला यांनी काय विरोध केला याबद्दल स्पष्टता नाही. काश्मीरमधील अनेक विद्यार्थी आजही पुण्यात शिकत आहेत. महाराष्ट्रात आपण काश्मिरी विद्यार्थ्यांना स्वीकारतो, मग काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदनाला विरोध का? असा आक्रमक सवाल संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला.

रामलीला मैदानात दिल्लीला इंडिया आघाडीचा मोठा मोर्चा आहे. त्याच्यासाठी उद्धव ठाकरेंना देखील बोलावलं आहे. आम्ही ते आमंत्रण स्वीकारलेलं आहे. नरेंद्र मोदी हे अरविंद केजरीवाल यांना घाबरतात. अरविंद केजरीवाल यांना अटक करून तुम्हाला सुकून मिळणार नाही, अरविंद केजरीवाल हे अजून खतरनाक बनणार. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातही जे तुरुंगात गेले आहेत ते अधिक मजबूत झाले आहेत, आणि नागरिक त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, असे संजय राऊत म्हणाले. शिवसेनेची पहिली यादी १५ ते १६ जणांची असेल ती यादी आम्ही उद्या जाहीर करू, अशी माहिती राऊत यांनी दिली. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत. त्यांनी आमच्यासोबत असावं असं आम्हाला वाटतं. आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे. महाविकास आघाडीमध्ये चार ते पाच पक्ष आहेत, प्रत्येकाला जागा मिळाली पाहिजे. आम्ही जिंकू, जनमत आता आमच्यासोबत आहे. बाळासाहेब आंबेडकर हे मोठे नेते आहेत. ते आमच्यासोबत आहेत, असे संजय राऊत प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत म्हणाले.

हे ही वाचा:

झुंडशाही,पवार पर्व संपवण्यासाठी आपली लढाई – विजय शिवतारे

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा एक उमेदवार जाहीर केल्यानंतर पंकजा मुंडेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss