Tuesday, April 30, 2024

Latest Posts

राजापुरात नितेश राणेंचं शक्ती प्रदर्शन

राजापूर येथील बारसू रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसूत जाणार आहेत. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोर्चा काढणार आहे.

राजापूर येथील बारसू रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसूत जाणार आहेत. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोर्चा काढणार आहे. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापणार आहे. कोकणात आज राजापूर तालुक्यातील नियोजित बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय धुमशान पाहायला मिळणार आहे. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसूत जाणार आहेत. ठाकरे गटाने त्यासाठी जोरदार तयारी केलीय. दरम्यान, त्यांच्या सभेला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोर्चा काढणार आहे. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापणार आहे.

कोकणात बारसू प्रकल्प नको, अशी येथील जनतेची मागणी आहे. राजापूर तालुक्यातील बारसू, सोलगाव परिसरातील स्थानिक नागरिकांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला तीव्र विरोध केला होता. यावेळी त्यांनी तीन दिवस आंदोलन केले. दरम्यान, आंदोलनकांवर पोलिसांनी बळाचा वापर केला. तर अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे हे आंदोलन चिघळले होते. पोलिसांनी धरपकड करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना ताब्यात घेतले होते. तर काही आंदोलक नेत्यांना अटक केली होती. त्यामुळे या आंदोलनात ठाकरे गटाने उडी घेतली.

 बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून कोकणातील राजकारण तापले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. तर, भाजपानेही रिफायनरी समर्थनार्थ कोकणात कार्यक्रम हाती घेतला आहे. ठाकरे आणि भाजपाच्या कार्यक्रमांना कोकणात परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर टीका केली. या टीकेला उत्तर देण्याकरता भाजपा नेते नितेश राणे यांनीही आज जनतेशी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसूमध्ये प्रकल्प होण्याकरता लिहिलेल्या पत्राबाबत टीका केली आहे.

“ग्रीन रिफायनरी कोकणात होतेय, त्याचं समर्थन करण्यासाठी आपण येथे जमलेलो आहोत. कोणीतरी एक पर्यटक मुंबईवरून आला आहे, बारसू गावात हेलिकॉप्टर उतरू दिलं नाही म्हणून जैतापूरमध्ये उभं केलं आहे. बारसू गावात लोकांशी बोलून, पेटवापेटवीचं काम करून ते पुन्हा मुबंईच्या दिशेने जाणार आहेत. मी तर महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंची ओळख करून द्यायची झाली तर महाराष्ट्रातला सर्वांत दलाल कोण असेल तर रत्नागिरी बारसूमध्ये आलेला आहे”, अशी टीका नितेश राणेंनी केली.

हे ही वाचा : 

रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंचं सरकारला आवाहन

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी ७.५ कोटींची कमाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss