Saturday, June 3, 2023

Latest Posts

Exculsive, Shinde – Thackeray यांच्यामधल्या राजकीय संघर्षांचा आँखोदेखां

देशाच्या राजकारणात भूकंप घडवणारं महासत्तांतर २१ जून २०२२ रोजी राज्यात घडलं. या सत्तांतरानंतर ५६ वर्षाच्या शिवसेनेत न भूतो अशी उभी फूट पडली.

देशाच्या राजकारणात भूकंप घडवणारं महासत्तांतर २१ जून २०२२ रोजी राज्यात घडलं. या सत्तांतरानंतर ५६ वर्षाच्या शिवसेनेत न भूतो अशी उभी फूट पडली. पक्षाचे सर्वेसर्वा असलेले पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे अवघ्या काही मिनिटांत खुर्चीवरून पायउतार होत घरी परतले. या सत्तासंघर्षाचा निवड सर्वोच्च न्यायालयात पोहचला आणि न्ययालयाने निर्णय देताना अनेक निरीक्षण नोंदवत ताशेरीही ओढले. मात्र उद्धव ठाकरेणच्या राजीनाम्यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी नेमके बोट ठेवले. उद्धवठाकरेंनाच राजीनामा हा महाविकस आघाडीची सत्ता जाण्याचा कळीचा मुद्दा ठरला. मात्र त्या आधीच पक्ष प्रमुखांचा मुख्यमंत्री होणं हीच राज्यातल्या सत्तांतराची नांदी होती का ? असा प्रश्न पडणारी अनेक निरीक्षण आणि घडामोडी घेऊन आलेलं राजकीय पत्रकार आणि लेखक राजेश कोचरेकर यांचं महासत्तांतर हे पुस्तक आपल्या समोरच्या काही प्रश्नांची उकल करत. त्यामुळेच देशातील सगळ्यात मोठ्या सत्तांतराचा निर्णय हाती येताच पुस्तकाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

महासत्तांतरातल्या पडद्यामागच्या अनेक गोष्टी, नेत्यांच्या करामती, मोठ्या नेत्यांचे निर्णय प्रसारमाध्यमांच्या किंवा वृत्तवाहिन्यांच्या नजरेस पडू शकल्या नाहीत. अशा अनेक गोपनीय आणि धक्कादायक गोष्टी सत्तेच्या चक्रव्यूहात थेट घुसून वाचकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न महासत्तांतर या पुस्तकातून करण्यात आलेला आहे. ‘इंकिंग इनोवेशन’च्या आनंद लिमये यांनी हे अत्यंत धाडसी पुस्तक वाचकांच्या भेटीला आणलेलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या राजकीय प्रवृत्ती आणि प्रकृतीच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणात जूनच्या मध्याला एक विलक्षण असा राजकीय भूकंप घडवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजकीय धाडसाने गल्ली ते दिल्ली असं देशाचं राजकीय क्षितिज हादरून गेलं. त्यातून अनेक प्रश्न राजकीय वर्तुळाभोवती उभे ठाकले. त्याची उत्तरं सगळ्यांना कुठं ठाऊक आहेत? शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजकीय आणि संघटनात्मक दृष्ट्या हादरवून टाकणाऱ्या या सत्तांतरातल्या अनेक गोष्टी प्रसारमाध्यमांच्या नजरेतून सुटल्या होत्या. या सत्तांतरानंतर शिवसेनेनं आपलं नाव आणि चिन्ह ही गमावलं. छोट्या पडद्यावर ब्रेकिंग न्यूजच्या कल्ल्यामध्ये निसटलेल्या अनेक गोष्टींचं धमाकेदार आणि रसरशीत पुस्तक नेते मंडळींच्या भुवया उंचावणारं आहे. डोक्याला झिणझिण्या आणणाऱ्या या पुस्तकातील अनेक तपशील जितके रोमांचक आहेत तितकेच स्फोटकदेखील आहेत.

गेले १० महिने राज्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात रंगला होता. देश विदेशातील कायदे तज्ज्ञांनी कायद्याचा कीस पडला. आणि बहुप्रतीक्षित असा राज्यातील शिंदेशाही सुरक्षित असल्याचा निर्णय आला. हे सत्तांतर नाट्य अवघ्या काही दिवसात घडले असलं तरी त्याची योजना खूप आधीपासूनच बनविण्यात आली होती. कायदा आणि न्याय व्यवस्थेवर टिकून राहील अशी पटकथा या सत्तांतर नाट्यासाठी बनविण्यात आली होती. ती कोणी बनवली, कुठे बनवली, कशी बनवली असे उत्कंठा वाढविणारे प्रश्न आपल्या समोर येतात. या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी राजकीय पत्रकार राजेश कोचरेकर यांनी लिहिलेले आणि ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांनी संपादित केलेले ‘महासत्तांतर’ आनंद लिमये यांनी वाचकांच्या भेटीला आणले आहे.

या पुस्तकांत अनेक राजकीय खुलासे झाल्याने काही नेत्यांची झोप उडाली नाही तरच नवल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निष्पक्ष आणि निर्भीडपणे या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. याआधी अनेक राजकीय, सामाजिक आणि आशयघन पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी परिचित असलेल्या ‘इंकिंग इनोवेशन’च्या आनंद लिमये यांनी सिद्ध केलेल्या या पुस्तकाला सिनेसृष्टीपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत आणि सनदी अधिकाऱ्यांपासून सामान्य वाचकांपर्यंत सगळ्यांनीच या पुस्तकावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हे पुस्तक राज्यातील सगळ्या प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. त्याचवेळी ते वाचकांना घरपोच मिळण्याची व्यवस्था आहे. २५० रुपयांचे पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी राज्यभरातले आणि देशभरातले वाचक मोबाईल क्रमांक 937 2807513 किंवा 022 24122756 क्रमांकावर संपर्क साधून तपशील मिळवू शकतात.

हे ही वाचा:

Maharashtra political Crisis News, सर्वात मोठी बातमी!, शिंदे सरकार बचावलं, उद्धव ठाकरेंचं कोर्टात पराभव

उद्धव ठाकरे PC LIVE : सत्तासंघर्षाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss