Saturday, April 27, 2024

Latest Posts

Raj Thackeray नी पत्राद्वारे केली PM Modi कडे मागणी, कुस्तीपटूंची फरफट थांबवा…

आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

सध्या राज्यासह संपूर्ण देशात अनेक घडामोडी या घडत आहेत. दिनांक २३ एप्रिलपासून देशातील नामांकित खेळाडू हे जंतरमंतर येथे आंदोलन करत आहेत. परंतु मागील २-३ दिवसांपासून या आंदोलनाला एक वेगळंच वळण हे आले आहे. तसेच या संदर्भात अनेक व्हिडिओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हयरल हे होत आहेत.तर काल हे सर्व आंदोलक ‘पदकं’ हरिद्वार येथील गंगेत विसर्जित करण्यासाठी गेले होते. पण शेतकरी नेत्यांच्या मध्यस्थीनंतर तूर्तास हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांनी थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्यावर सन्मानजनक तोडगा काढावा अशी विनंती मनसे अध्यध राज ठाकरे यांनी केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे पात्र ट्विट देखील केले आहे. या ट्विट मध्ये ते म्हणाले आहेत कि, सन्मा. भारताचे पंतप्रधान @narendramodi जी, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसंच आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं, ही नम्र विनंती.

 तसेच राज ठाकरे यांनी पत्र देखील ट्विट केले आहे. आणि या पत्रात ते म्हणाले आहेत की, सस्नेह जय महाराष्ट्र,

आज तुमचं एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्रप्रपंच. खरं तर, लक्ष वेधून घेणं हे तेंव्हा म्हणता येईल जेंव्हा तुम्हाला त्या विषयाची पुरेशी माहिती नसेल तर. पण आपणांस हा विषय माहीत आहे हे नक्की, त्यामुळे आता ‘प्रधानसेवक’ ह्या नात्याने आपण ह्या विषयाकडे लक्ष द्यावं ही विनंती.

ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा, आणि ह्या लढाईत कोणाच्याही ‘बाहुबला’चं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवी आहे, म्हणजे अर्थात आपणाकडून हवी आहे

ह्या आधी आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना उत्तराखंडमध्ये दुर्घटना घडली तेंव्हा असो की मुंबईतील २६/११ च्या घटनेच्या वेळेस धाव घेतली होतीतही तुमची सहृदयता होती आणि हीच सहृदयता तुम्ही तुमच्या कार्यालयापासून किंवा निवास्थानापासून अवघ्या काही किलोमीटवर असलेल्या महिला कुस्तीपटूंना दाखवावी ही जशी त्या महिला कुस्तीपटूंची आहे तशीच इच्छा/ विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण आहे.

म्हणूनच जर त्यांना योग्य न्याय नाही मिळाला तर कुठल्या खेळाडूला स्वतःच्या रक्ताचं पाणी करून देशासाठी पदक मिळवावं असं वाटेल? आपल्या देशातील सरकारला जर आपल्या दुःखाची पर्वा नाही असं चित्र उभं राहिलं तर ‘खेलो इंडिया’ हे स्वप्नच राहील. जर आपण खेळाडूंना देशाचा गौरव म्हणत असू तर मग त्यांची २८ मे ला ज्या पद्धतीने फरफट झाली तशी फरफट होणार नाही आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना आश्वस्त केलं जाईल इतकं तर आपण नक्कीच कराल ह्याची मला खात्री आहे.

आपण ह्या विषयांत लक्ष घालावं आणि ह्या विषयात तोडगा काढावा ही पुन्हा एकदा विनंती.

हे ही वाचा : 

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री Vaibhavi Upadhyaya चा कार अपघातात मृत्यू

‘सामना’तून भाजपवर हल्लाबोल, जयंत पाटील यांनी….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss