Friday, April 26, 2024

Latest Posts

रोहित पवार यांचा पक्षातील लोकांना सवाल

महाराष्ट्रात काही नवीन तयार झालेले नेते खालच्या पातळीवर जाऊन बोलत पदाची अपेक्षा करत असावेत. भाजपाचे स्वयंघोषित नेते खालच्या पातळीवर बोलतात तेव्हा वरिष्ठ नेते शांत असतात.

महाराष्ट्रात काही नवीन तयार झालेले नेते खालच्या पातळीवर जाऊन बोलत पदाची अपेक्षा करत असावेत. भाजपाचे स्वयंघोषित नेते खालच्या पातळीवर बोलतात तेव्हा वरिष्ठ नेते शांत असतात. याचा अर्थ त्यांचेही याला पाठबळ असल्याचं दिसतं. एका कार्यक्रमात बोलताना गोपीचंद पडळकरांनी सांगितलं की, “गेल्यावर्षी जयंतीला पवारांनी मस्ती केली, केली का नाही? यावर्षी पवार का नाही आला? पवार ४ वेळा मुख्यमंत्री, १२ वर्षे केंद्रात मंत्री होता, मागचं मला माहिती नाही. राज्यात १९९९ पासून २०१४ पर्यंत त्यांचं सरकार होतं, ते एकदाही चौंडीला आले नाहीत. गेल्यावर्षी त्यांना आपली चौंडी काढून घ्यायची होती,” असा आरोप गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर केला आहे. सु यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याव्यतिरिक्त एकाही नेत्याने चकार शब्द काढला नव्हता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पक्षातील नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत.

सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती,” अशा शब्दांत रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.भाजपा नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी एकेरी उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.शरद पवारांनी अनेक नेत्यांना मोठं केलं. पण, शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन बोललं जातं, तेव्हा कार्यकर्तेच लढतात. ज्या नेत्यांनी पद भूषावली आहेत, ते याबद्दल काहीच बोलत नाहीत. फक्त ऐकत बसले आहे हि मात्र अपमानीय गोष्ट आहे. फक्त अजित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, बाकीचे सर्व शांत बसले आहेत. आम्ही कार्यकर्ता म्हणून लढत राहू. शरद पवारांवर जो कोणी बोलेल, त्याला उत्तर देऊ. पण, नेते गप्प का बसतात हे कळत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.

अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार आणि पडळकरांच्या विधानावर त्यांचे मत व्यक्त केले आहे. अजित पवार हे खूप परखडपणे बोलत असतात आणि म्हणूनच त्यांनी थेट निशाणा साधत असतात .आणि म्हणूनच सुधीर मुनगंटीवार आणि पडळकरांअजित पवारांनी म्हटलं की, “संस्कार होतील, तसेच ते बोलणार आणि वागणार. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण, दुसऱ्यांकडून कशाचीही अपेक्षा नाही. त्यावर बोलू शकत नाही,” असे म्हणत अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांचा नामोल्लेख करणं टाळलं आहे.

Latest Posts

Don't Miss