Friday, April 26, 2024

Latest Posts

Admission घेण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक..

मागील काही दिवसांपूर्वीच दहावी आणि बारावीचा निकाल हा उत्तम टक्क्याने लागला. या परीक्षेच्या निकालात सर्व विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.

मागील काही दिवसांपूर्वीच दहावी आणि बारावीचा निकाल हा उत्तम टक्क्याने लागला. या परीक्षेच्या निकालात सर्व विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले. एचएससी (HSC) चा निकाल हा ९१.२५ टक्क्यांनी लागला असून एसएससी चा निकाल हा ९३.८३ टक्क्यांनी लागला आहे. यावर्षी देखील दोन्हीही परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थी व पालकांची धावपळ ही पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी सुरु होते. कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी बरीच महत्वाची कागदपत्रे लागतात. या महत्वाच्या कागदपत्रांची पूर्वकल्पना नसल्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्यावेळी बऱ्याच अडचणी निर्माण होतात. त्यामुळे कॉलेजमध्ये विविध कागदपत्रे सबमिट (Sumbit) करण्यासाठी भरपूर खेपा माराव्या लागतात. म्हणूनच आम्ही तुम्हाला ऍडमिशनच्या (Admission) वेळी लागणाऱ्या महत्वाच्या कागदपत्रांची माहिती देणार आहोत.

आवश्यक कागदपत्रे:

दहावी आणि बारावीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखल ही महत्वाची कागदपत्रे तुम्हाला शाळेमार्फत दिली जातात. त्याचबरोबर चारित्र्याचे प्रमाणपत्र, राहत्या घरचा पत्ता, रेशनकार्ड किंवा वीजबिल, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड व तुमचा पासपोर्ट साईज फोटो हि सर्व महत्वाची कागदपत्रे आहेत. अभियांत्रिकी त्याचबरोबर मेडिकलच्या अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीयत्वाचा दाखला गरजेचा असतो. राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातून मिळवता येतो.

उत्पन्नाचा दाखला:

ऍडमिशनसाठी उत्पन्नाचा दाखल सोबत ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सिद्ध करण्यासाठी या प्रमाणपत्राची गरज भासते. प्रवेश घेण्यासाठी जाताना उत्पनाचा दाखल जरूर सोबत ठेवावा.

जातीचे प्रमाणपत्र:

तुमचे जातीचे प्रमाणपत्र असल्यास तुम्हाला राखीव जागांचा लाभ घेता येतो. जातीचे प्रमाणपत्र वेळीस काढलेले बरे कारण प्रवेश प्रक्रियेच्या वेळी अर्जांची गर्दी होते. जातीचे प्रमाणपत्र हे वर्षभरात कधीही दिले जाते. त्यामुळे वर्षभरात कधीही तुम्ही हे जातीचे प्रमाणपत्र कधी शकता. जातीचे प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळविण्यासाठी तहसीलदार कार्यालयातून सेतू केंद्राची सोय आहे. त्याचप्रमाणे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महा ई-सेवा केंद्र अथवा आपले सरकार या ठिकाणी अर्ज करता येतो.

हे ही वाचा:

महालक्ष्मीच्या चरणी Bai Pan Bhari Deva ची टीम नतमस्तक । Music Launch at Mahalaxmi

कार विकायची आहे? जाणून घ्या कार विकायचा perfect time

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss