Friday, April 26, 2024

Latest Posts

संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांचा घेतला चांगलाच समाचार, तुमचं सरकार आता स्मशानात पोहोचलं

आज सकाळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे यावेळी बोलत असताना संजय राऊत यांनी अनेक टीका केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सत्ताधाऱ्यांकडून महाविकास आघाडीवर जोरदार टीका ही करण्यात आली होती.

आज सकाळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे यावेळी बोलत असताना संजय राऊत यांनी अनेक टीका केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सत्ताधाऱ्यांकडून महाविकास आघाडीवर जोरदार टीका ही करण्यात आली होती. तेव्हा सत्ताधारी म्हणाले होते की, महाविकास आघाडीच्या सरकारला लकवा मारला होता. सत्ताधाऱ्यांच्या या टीकेचा आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी चांगलाच समाचार हा घेतला आहे. राज्यात सरकार आहे का? तेव्हा लकवा मारला होता म्हणता. तुमचं सरकार आता स्मशानात पोहोचलं आहे. काहीच हलत नाही. कान, नाक, डोळे सर्व बंद आहे. लकव्याच्या गोष्टी करू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली.

तसेच संजय राऊत यांनी नगरच्या नामांतराला पाठिंबा दिला आहे. अहिल्यादेवी होळकरांचा हा सारा देश ऋणी आहे. अहिल्याबाई होळकर यांचे नाव गाजलेलं आहे. उत्तम शासन कर्ते त्या होत्या. हिल्यादेवी होळकर या उत्तम राज्यकर्त्या होत्या. कुशल प्रशासक होत्या. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात या ठिकाणी फोटो हटवणल्या नंतर असे सुचले आहे. पण या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याला जर नाव मिळत आहे तर विरोध करायाचं काही करण नाही. असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच संजय राऊत यांनी कुस्तीपटुंसंदर्भात देखील त्याची प्रतिक्रिया ही दिली आहे. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात घडलेल्या घटनेनंतर राज्य सरकारला ही उपरती झाली. कुस्तीगीरांच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारनं भूमिका घेतली पाहिजे. कुस्तीपटुंना न्याय मिळावा ही संपुर्ण देशाची भावना आहे. त्यांना न्याय नाकारून चालणार नाही.

किर्तीकर जे बोलले ते मी ऐकलंय, त्यांनीही परत ऐकावं. गजानन किर्तीकर हे आमच्या इथे जेष्ठ होते परंतु आता ते तिथे आहेत की नाही. गजानन किर्तीकर यांनी त्यांचे वक्तव्य ऐकावं. त्यांच्यासारखे जेष्ठ नेते जेव्हा बोलतात तेव्हा त्यामागची कथा स्पष्ट आहे स देखील संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच अजय राऊत यांनी पुढे पंकजा मुंडे यांच्यावर देखील भाष्य केले आहे. पंकजा मुंडेनी त्यांची व्यथा बोलून दाखवली. ज्यांनी भाजप शून्यातून निर्माण केला, त्याचं आज अस्तित्त्व काय उरलंय?. पंकजा मुंडेचा पराभव का झाला हे आम्ही वेगळं सांगायची गरज नाही. गोपीनाथ मुंडे आज असते तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असत. त्यामुळे राजकीय कुटुंबातील जेष्ठ व्यक्तींनी परिणामांचा विचार न करता निर्णय घ्यायला हवा. तरच त्यांचं अस्तित्व टिकून राहील. असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates

Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss