Thursday, May 9, 2024

Latest Posts

अग्रलेखातील आरोपानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, अग्रलेख वाचला नाही…

गेल्या काही राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग हा आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात अनेक घडामोडी या घडत होत्या. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा म्हणजेच शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

गेल्या काही राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग हा आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात अनेक घडामोडी या घडत होत्या. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा म्हणजेच शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आणि त्यांच्या या राजीनाम्यामुळे राजकारणात अनेक चर्चाना उधाण हे आले होते. तर राजकीय क्षेत्रात देखील चांगलीच खळबळ ही उडाली होती. पवारांनी सर्वांच्या आग्रहाखातर हा राजीनामा शरद पवार यांनी मागे घेतला. परंतु आज थेट ‘सामना’ च्या अग्रलेखातून शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी आहेत असा थेट आरोप आज करण्यात आला आहे. तसेच या आरोपानंतर शरद पवार यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे.

तसेच शरद पवार हे पुढे म्हणाले आहेत की, अग्रलेख माझ्या वाचनात आलेला नाही आहे. सामना किंवा त्यांच्या संपादक हे सगळे आम्ही एकत्र काम करतो. एकत्र काम करताना पूर्ण माहितीवरच भाष्य करणं योग्य होईल. अन्यथा गैरसमज होतात. पण माझी खात्री आहे की त्यांची भूमिका ही ऐक्याला पोषक असेल.

तसेच यावेळी बोलताना शरद पवारांनी स्पष्ट केलं की, हे खरं आहे की पक्षाचे कार्यकर्ते आणि अनेक हितचिंतक अस्वस्थ होते, पण सगळ्यांच्या आग्रहासाठी मला माझे निर्णय बदलावा लागला. निर्णय बदलला त्यात एक गैरसमज होता. अध्यक्षपद सोडलं म्हणजे संघटनेचं काम, लोकांशी संवाद सोडायचं ठरवलं नव्हतं. पण तो गैरसमज झाला. तो दूर झाला याचा आनंद आहे. माझी पद्धत आहे सुरूवात करायची असेल तर मी दोन ठिकणं निवडतो. एक सोलापूर नाहीतर कोल्हापूर असंही शरद पवार म्हणाले.

साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणणाऱ्या फडणवीसांनी देखील शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान निपाणी इथे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होती. साडे तीन जिल्ह्यांचा पक्ष निपाणीत निवडणूक लढवतोय, त्यांचं पार्सल पॅक करून परत पाठवून द्या, आम्ही बघून घेऊ असे म्हणाले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवरांनी प्रत्तुत्तर दिलं आहे. मी निपाणीला चाललो आहे. त्यामुळे कोण पार्सल आहे अन् कोण किती वस्ताद आहे ते तिथं जाऊन खोलात बोलायचं इथं नाही, अशा शब्दात पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिलं.

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss