Tuesday, April 30, 2024

Latest Posts

CSK vs KKR आज रंगणार सामना, ‘हा’ संघ मारणार बाजी…

आयपीएलचा (Indian Premier League) (IPL) थरार सुरु होऊन दोन आठवडे उलटून गेले आहेत. पुढील महिनाभर क्रिकेट फॅन्सना आयपीएलचा जल्लोष संपूर्ण देशभरात पाहायला मिळणार आहे. आज (सोमवार, ८ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) असा सामना रंगणार असून अत्यंत चुरशीची लढत क्रिकेट फॅन्सना अनुभवायला मिळणार आहे. चेन्नईला मागील दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला असून त्यांना विजयाची आवश्यकता आहे. कोलकाताने आपल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला असून आपला विजयरथ कायम ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. या दोघांपैकी कोण बाजी मारणार हे थोड्याच वेळात कळणार आहे. चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियम (Chidambaram Stadium) येथे रात्री ७.३० वाजता ह्या सामन्याला सुरुवात होणार आहे.

चेन्नईने आतापर्यंत ४ सामने खेळले असून २ सामन्यात विजय मिळवला आहे. तर, २ सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Chalengers Banguluru) आणि गुजरात टायटन्स (Gujrat Titans) यांच्याविरुद्ध सामना जिंकला होता. तर दिल्ली कॅपिटल्स (Delhi CapitalS) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Haiderabad) यांच्याविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या तिन्ही सामन्यात बाजी मारली आहे. कोलकाताने सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांना धूळ चारली आहे. चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियम येथे हा सामना होणार असून या स्टेडियमची खेळपट्टी हि फिरकी गोलंदाजांना नेहमीच फायदेशीर ठरते. परंतु, या हंगामात येथे झालेल्या दोन सामन्यात वेगवान गोलंदाजांना मदत झाल्याचे दिसले आहे. तसेच, फिरकी गोलंदाजांना मात्र थोडा संघर्ष करावा लागताना दिसत आहे. चेन्नईने इथे दोन्ही सामन्यात धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे त्यामुळे आजही वेगवान गोलंदाजांसाठी हि पीच जरी फायदेशीर ठरत असली तरीही फलंदाजांसाठी जास्त उपयुक्त ठरू शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चेन्नई सुपर किंग्स संभाव्य प्लेयिंग ११ –

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य राहणे, शिवम दुबे, डेरील मिचेल, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी (यष्टीरक्षक), दिपक चहर, तुषार देशपांडे, महेश तिक्षणा

कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य प्लेयिंग ११ –

सुनील नारायण, फिल सॉल्ट, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरून चक्रवर्ती

हे ही वाचा:

Suryakumar Yadav चे MI मध्ये कमबॅक.. ‘ह्या’ प्लेअर्सना बसावे लागेल बाहेर

BCCI ची मोठी अपडेट, IPLच्या दोन सामन्यांची तारीख बदलली!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss