Tuesday, April 30, 2024

Latest Posts

Suryakumar Yadav चे MI मध्ये कमबॅक.. ‘ह्या’ प्लेअर्सना बसावे लागेल बाहेर

मुंबई इंडिअन्सच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी असून भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याचे पुनरागमन झाले आहे.

मुंबई इंडिअन्सच्या (Mumbai Indians) फॅन्ससाठी आनंदाची बातमी असून भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचे पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर असलेल्या सूर्यकुमारच्या कमबॅकमुळे मुंबई इंडियन्स संघाला दिलासा मिळाला असून मुंबई इंडियन्स संघाला बळकटी मिळाली आहे. कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वात खेळत असलेल्या मुंबई इंडिअन्सला अजून विजयाचे खाते उघडता आलेले नाही. आतापर्यंत मुंबईने तीन सामने खेळले असून तीनही सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. आता सूर्याच्या पुनरागमनामुळे मुंबईच्या ताफ्यात काय इम्पॅक्ट पडतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.

सूर्यकुमार दुखापतीमुळे तीन महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर होता. आता एनसीएकडून (NCA) त्याला फिटनेस सर्टिफिकेट मिळाले असून तो पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. सूर्यकुमारने मुंबईच्या ताफ्यात दाखल होत सरावालादेखील सुरुवात केली आहे. त्यामुळे, ७ एप्रिल रोजी दिली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध होणाऱ्या सामन्यात तो खेळताना दिसण्याची शक्यता आहे. त्याच्या संघातीळ पुनरागमनामुळे मुंबईचा संघ संतुलित दिसत आहे. त्यामुळे, आतातरी मुंबईला विजयाची चव चाखता येईल का हे लवकरच स्पष्ट होईल.

सूर्यामुळे या खेळाडूंना मिळणार संघाबाहेरचा रस्ता

सूर्यकुमारच्या संघातील एन्ट्रीमुळे काही खेळाडूंना प्लेइंग ११ मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. मधल्या फळीतील फलंदाज नमन धीर तसेच डेवॉल्ड ब्रेवीस यांनी फारशी चांगली कामगिरी न केल्यामुळे त्यांना प्लेयिंग ११ मध्ये स्थान न मिळण्याची शक्यता आहे. या दोघांशिवाय, पियुष चावला यालादेखील विशेष कामगिरी करता आलेली नाही त्यामुळे त्यालाही संघाबाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. त्याच्याऐवजी ऑलराऊंडर मोहम्मद नबी याला संधी मिळू शकते. तेज गोलंदाज क्वेना मफाका याच्या ऐवजी नुवान तुषारा याला संधी मिळू शकते.

हे ही वाचा:

BCCI ची मोठी अपडेट, IPLच्या दोन सामन्यांची तारीख बदलली!

मुंबईचा सलग तिसरा पराभव, काय म्हणाला Hardik Pandya?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss