Saturday, April 27, 2024

Latest Posts

IPL 2024 चे ‘हे’ नवे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

२२ मार्च २०२४ पासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) अर्थात आयपीएलच्या सीजनला सुरुवात होणार आहे. आयपीएलचा हा खेळ यंदा भारतामध्येच खेळण्यात येणार आहे. यावर्षी आयपीएल खेळाडूंना दोन नव्या नियमांचा सामना करत खेळ रंगवायचा आहे. आयपीएल मधील सलामीचा सामना महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) च्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यामध्ये होणार आहे.

आरसीबी आता नवीन नाव आणि नवीन जर्सी घेऊन आयपीएल (IPL) मध्ये प्रवेश करणार आहे. आयपीएल २०२४ मध्ये गोलंदाजांसाठी बाउन्सर आणि पंचांसाठी स्मार्ट रेल्वे सिस्टमचे नियम आता लागू होणार आहे. यासोबतच, आयपीएलमध्ये बॉलर्सला एका ओव्हरमध्ये फक्त दोन बाऊन्सर टाकण्याची परवानगी असणार आहे यासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये एकच बाऊन्सर टाकण्याचा नियम आहे. पण आता मात्र, आयपीएलमध्ये बदल करण्यात आला आहे. याआधी हा नियम भारतीय देशांतर्गत टी-20 या स्पर्धेत सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीमध्ये वापरण्यात आला होता.

नव्या नियमानुसार आता टीव्ही अंपायर आणि हॉक आय ऑपरेटर एकाच खोलीत बसणार आहेत. तसेच स्मार्ट रिप्ले प्रणाली अंतर्गत टीव्ही अंपायर्सना आता थेट हॉक आय ऑपरेटर कडून माहिती देण्यात येणार आहे. आतापर्यंत टीव्ही अंपायर आणि हॉक आ  यांच्यामध्ये टीव्ही प्रसारण दिग्दर्शक खूप महत्त्वाची भूमिका बजावत होता. ब्रॉडकास डायरेक्टर निर्णय देण्यासाठी हॉक आय पासून टीव्ही अंपायरला सर्व फोटो देण्यात यायचे. पण आता टीव्ही ब्रॉडकास डायरेक्टर ची भूमिका संपणार आहे.

हे ही वाचा:

प्रकाश पोहरेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, बंद दाराआड अर्धा तास चर्चा

स्वत:चा संस्कृतपणा बघा, मग मुख्यमंत्र्यांना बोला; शिवसेना प्रवक्ते आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss