Tuesday, April 30, 2024

Latest Posts

MI वि. DC सामन्यात कोण जिंकणार? सूर्याच्या कमबॅकमुले मुंबई बाजी मारणार..

आयपीएलचा (Indian Premier League) (IPL) थरार सुरु होऊन दोन आठवडे उलटून गेले आहेत. पुढील महिनाभर क्रिकेट फॅन्सना आयपीएलचा जल्लोष संपूर्ण देशभरात पाहायला मिळणार आहे. आज (रविवार, ७ एप्रिल) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) असा सामना रंगणार असून अत्यंत चुरशीची लढत क्रिकेट फॅन्सना अनुभवायला मिळणार आहे. मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघाना विजयाची आवश्यकता असून या दोघांपैकी कोण बाजी मारणार हे काहीच वेळात कळणार आहे. मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) येथे दुपारी ३.३० वाजता ह्या सामन्याला सुरुवात होणार आहे.

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली खेळात असलेल्या मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. यापैकी एकाही सामन्यात मुंबईला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे मुंबईच्या फॅन्सकडून टीकेची झोड उठवली जात आहे. त्यातच नवा कर्णधार हार्दिक पांड्या याला प्रेक्षकांच्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. एकही सामना न जिंकल्यामुळे मुंबईची पॉईंट्स टेबलची पाटी कोरीच राहिली असून ते सगळ्यात शेवटच्या स्थानी ढकलले गेले आहेत. परंतु, मुंबईच्या संघात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) परतल्यामुळे आता ते कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

मुंबई आणि दिल्ली यांनी एकमेकांविरुद्ध आतापर्यंत एकूण ३३ सामने खेळले आहेत. त्यापैकी मुंबईने १८ वेळा तर दिल्लीने १५ वेळा बाजी मारली आहे. आज होणाऱ्या सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे सर्व क्रिकेट फॅन्सचे लक्ष असणार आहे.

मुंबई इंडियन्स संभाव्य संघ
हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोटझी, आकाश मढवाल

दिल्ली कॅपिटल्स संभाव्य संघ
रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसिख सलाम, एनरिक नॉरखिया, इशांत शर्मा, खालील अहमद, जॅक फ्रेजर मॅकगर्क

हे ही वाचा:

Suryakumar Yadav चे MI मध्ये कमबॅक.. ‘ह्या’ प्लेअर्सना बसावे लागेल बाहेर

BCCI ची मोठी अपडेट, IPLच्या दोन सामन्यांची तारीख बदलली!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss