Tuesday, April 30, 2024

Latest Posts

Shahrukh Khan ने वाढवले आपल्या टीमचे मनोबल, दिले प्रेरणादायी भाषण

काल केकेआर व्हर्सेस आरआर (KKR VS RR) ची आयपील मधली ३१वि मॅच होती. कालचा सामना अटीतटीचा ठरला. काल राजस्थान रॉयल्सनी अवघ्या २ धावांनी विजय मिळवला

सध्या आयपीएल (IPL) ची क्रेझ सर्वत्र चालू आहे आणि भारतात क्रिकेटप्रेमींची काही कमी नाही. १६ एप्रिल रोजी  केकेआर व्हर्सेस आरआर (KKR VS RR) ची आयपीलमधील ३१ वी मॅच होती. कालचा सामना अटीतटीचा ठरला. काल राजस्थान रॉयल्सनी अवघ्या २ धावांनी विजय मिळवला. जोस बटलर आणि रोव्हमन पॉवेल यांच्या खेळीमुळे कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Night Riders) ला जिंकता आली नाही. पराभवानंतर टीममध्ये एकच निराशेचे वातावरण दिसून आले. यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा मालक म्हणजेच शाहरुख खान (Shahrukh Khan) याने ड्रेसिंग रूममध्ये येत प्रेरणादायी भाषण देत आपल्या टीमचे मनोबल वाढवले. कोलकाता नाईट रायडर्सने सुनील नरेनच्या जोरावर ६ बाद २२३ धावा केल्या होत्या. सुनील नरेनने १९० धावा केल्या होत्या. त्याचबरोबर २२३ धावा करणाऱ्या राजस्थानला कोलकाता बॉलर्सने मागे टाकले होते. राजस्थानच्या डावाच्या १६ ओव्हर्सपर्यंत मॅच कोलकाताच्या हातात होती. पण जोस बटलर आणि रोव्हमन पॉवेल यांच्या खेळीमुळे राजस्थानने मॅच जिंकली. पराभवामुळे कोलकाता नाईट रायडर्स निराश झाल्याचे पाहण्यात आले.

कोलकाता नाईट रायडर्सचा संघमालक म्हणजे शाहरुख खान याला आपले खेळाडू नाराज झाल्याचे दिसताच त्याने त्यांचे मनोबल वाढवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. शाहरुख खानने केकेआर टीमशी ड्रेसिंग रूम मध्ये संवाद साधला. संवाद साधताना तो म्हणाला, ‘जीवनात असे दिवस येतच असतात. काही दिवस आपण विजयास पात्र असतो, पण काही दिवस पराभवास पात्र असतो. गोष्टी बदलत राहतात. आज आपण पराभवास पात्र नव्हतो. आपण सगळेच खूप चांगले खेळलो. स्वतःच्या कामगिरीबद्दल अभिमान बाळगा निराश होऊ नका, खचून जाऊ नका. आनंदी राहा आपण जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये येतो तेव्हा आपले मनोबल उंचावले जायला हवे.’

याशिवाय शाहरुख म्हणाला ‘सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांमध्ये ऊर्जा आहे. आपल्या खेळाडूंमध्ये उत्तम बॉण्डिंग आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो, आजचा हा दिवस अभिमान वाटण्यासारखाच आहे. आपण खूप चांगले खेळलो, मी कुणाचेही नाव घेत नाही. गौतम तू ही निराश होऊ नकोस. देवाच्या कृपेने आपण लवकरच आपल्या कामगिरीसह पलटवार करू.’ असे म्हणत शाहरुखने सर्वांना सकारात्मकता दिली.

हे ही वाचा:

लढाई फक्त VBA आणि BJP मध्ये, Prakash Ambedkar यांचे कार्यकर्त्यांना पत्र Abhijit Bichukle उतरणार निवडणुकीच्या रणसंग्रामात? टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss