Monday, June 5, 2023

Latest Posts

Amazon India ने तब्बल ५०० कर्मचाऱ्यांना काढले कामावरून

एकीकडे जर पहिले तर सध्या भारतात नोकऱ्यांची मोठी कमतरता आहे तर दुसरीकडे येथील कंपन्या लोकांना कामावरून काढून टाकत आहेत. यातच आता अँमेझॉन कंपनीकडून एक धक्कादायक बातमी समोर आले आहे.

एकीकडे जर पहिले तर सध्या भारतात नोकऱ्यांची मोठी कमतरता आहे तर दुसरीकडे येथील कंपन्या लोकांना कामावरून काढून टाकत आहेत. यातच आता अँमेझॉन कंपनीकडून एक धक्कादायक बातमी समोर आले आहे. दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अँमेझॉन ने भारतात काम करणाऱ्या लोकांना कामावर तलवार ठेवली आहे. म्हणजेच अँमेझॉन कंपनी भारतातील लोकांना काढून टाकत आहे. कंपनी देशातील सुमारे ५०० कर्मचाऱ्यांच्या काढून टाकण्याचा विचार करत आहे अशी माहिती समोर अली आहे.

अमेझॉन ही अनेक मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक आहे जी मेटा आणि गुगलसह त्यांची श्रेणी कमी करत आहेत. अँमेझॉन चे सीईओ अँडी जॅसी यांनी मार्चच्या अखेरीस याची घोषणा केली होती, ज्यामुळे जगभरातील या कंपनीमधील ९००० करमर्चाऱ्यांवर याचा परिणाम हा झाला आहे. अँमेझॉन कंपनीमध्ये अजूनही वाढत आहे. त्याच्या सर्वात मोठ्या विक्रेत्यांपैकी एक, Appario, भारतातील नियमांचे पालन करण्यासाठी नवीन विक्रेत्याकडे इन्व्हेंटरी हस्तांतरित करत आहे. गेल्या वर्षी, Amazon ने भारतातील अन्न, वितरण, एडटेक आणि घाऊक वितरणासह अनेक व्यवसाय बंद केले होते.

तसेच अँमेझॉनकडून कोची आणि लखनऊमध्ये सेलर ऑनबोर्डिंग फंक्शन बंद करण्यात आले आहे. तर अँमेझॉन च्या सूत्रांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेझॉनने अलिकडच्या काही महिन्यांत दुसऱ्यांदा कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने सांगितले होते की सुमारे १८,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाईल.

गेल्या जानेवारीमध्ये कंपनीने गुरुग्राम, बेंगळुरूसह अनेक कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. बहुतांश छाटणी तोट्यात असलेल्या विभागांकडून करण्यात आली. आर्थिक मंदीमुळे बहुतांश आयटी कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जागतिक मंदीच्या भीतीमुळे इतर अनेक कंपन्याही त्यांच्या कर्मचाऱ्यांची छाटणी करत आहेत.

हे ही वाचा : 

मविआ ची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार, जयंत पाटील

Sharad Pawar यांनी बोलावली मविआ ची महत्वाची बैठक, जागा वाटपावर चर्चा होणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss