Thursday, May 2, 2024

Latest Posts

LOKSABHA ELECTIONS 2024 निमित्त GOOGLE चे अनोखे डूडल

. लोकसभा निवडणूक २०२४ स सुरवात देखील झाली आहे. आज जवळजवळ १२० लोकसभा मतदार संघात निवडणूक होणार आहेत. यामध्ये १६२५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. आज लाखो लोक मतदान करतील आणि याच मतदारांना प्रेरणा देण्यासाठी गुगल ने डुडल निर्माण करत भारतीय लोकशाहीला गुगल ने सलाम ठोकला आहे.

सध्या संपूर्ण देशभरात निवडणुकीचे वारे वाहत आहे. लोकसभा निवडणूक २०२४ ला सुरुवात झाली आहे. आज जवळजवळ १२० लोकसभा मतदार संघात निवडणूक होणार आहेत. यामध्ये १६२५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. आज लाखो लोक मतदान करतील आणि याच मतदारांना प्रेरणा देण्यासाठी गुगलने डुडल निर्माण करत भारतीय लोकशाहीला गुगलने सलाम ठोकला आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे, म्हणून मतदानाला भारतात विशेष महत्त्व आहे. याच दिवशी गुगलने संधी साधून त्याचे डुडल चेंज केले आहे.

भारतात मतदान झाल्यानंतर मत दिलेल्या व्यक्तीच्या डाव्या हाताच्या इंडेक्स फिंगर म्हणजेच तर्जनी बोटाला शाई लावली जाते. नख आणि त्वचा या दोन्हींवर शाई लावली जाते. ही शाई बोटाला असं म्हणजे आपण आपलं कर्तव्य पार पडल्याची निशाणी असते. गुगलने डुडलच्या माध्यमातून लोकांना मतदानासाठी प्रेरित केले आहे. मतदान करण्याआधी बोटाला शाई लावली जाते. शाई लावलेली नसेल तर बोगस मतदार ओळखता येतो. एखाद्या व्यक्तीच्या हाताला डावी तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या हाताच्या कुठल्याही इतर बोटाला शाई लावता येते. एखाद्या व्यक्तीच्या हाताला जर एकही बोट नसेल तर त्याच्या उजव्या हाताला शाई लावले जाते. जर दोन्ही हाताला एक ही बोट किंवा तळहात नसेल तर जिथून हात दुखावला गेला आहे त्याच्या टोकावरती शाई लावली जाते.

२०१९ मध्ये ही निवडणुकीच्या वेळी गुगलने अश्याच प्रकारचे डुडल लाँच केले होते आणि यावर्षीही अश्याच काही प्रकारचे डुडल दिसून येत आहे. यावर्षी भारतीय निवडणूक आयोगाने २६.५५ लाखाच्या शाईच्या बॉटल खरेदी केल्या आहेत. ज्याला ५५ कोटींचा खर्च आला आहे. भारतीय निवडणूक प्रक्रियेमध्ये शाईचा वापर सुरु होऊन लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये ६२ वर्ष होत आहेत. यावर्षी भारतीय निवडणूक प्रक्रियेमध्ये शाईचा वापर करून ६४ वर्ष पूर्ण होत आहे.

हे ही वाचा:

उन्हाळयात बनवा आंबट गोड कैरीचे वरण

Mahayuti मध्ये धुसफूस कायम, Mihir Kotecha यांच्या प्रचारसभेतून शिवसैनिकांनाच सभात्याग

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss