Tuesday, May 30, 2023

Latest Posts

Mother’s day निमित्त आईसाठी बनवा ‘हा’ खास केक

मदर्स डे(Mother's day) म्हणजेच आपण त्याला मराठीत मातृदिन असेही म्हणतो. मदर्स डे हा आईचा दिवस. खरतर वर्षातील प्रत्येक दिवस हे आईचेच असतात. परंतु एक खास दिवस तिच्यासाठी व तिच्यावर असलेल्या प्रेमासाठी अर्पण केला जातो तो म्हणजे अर्थातच मदर्स डे.

मदर्स डे(Mother’s day) म्हणजेच आपण त्याला मराठीत मातृदिन असेही म्हणतो. मदर्स डे हा आईचा दिवस. खरतर वर्षातील प्रत्येक दिवस हे आईचेच असतात. परंतु एक खास दिवस तिच्यासाठी व तिच्यावर असलेल्या प्रेमासाठी अर्पण केला जातो तो म्हणजे अर्थातच मदर्स डे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला आईसाठी काही खास करायला किंवा आई बद्दलचे प्रेम व्यक्त करायला सवड मिळत नाही. म्हणूनच मदर्स डे च्या निमित्ताने आपल्याला आईसाठी काहीतरी खास करण्याची संधी मिळते. मदर्स डे ची सुरुवात हि अमेरिकेत झाली. प्रत्येकवर्षी हा दिवस मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केले जातो. १४ मे ला मदर्स डे आहे.

आई आणि मुलांचं नातं हे जागावेगळं असत. आईच तिच्या मुलांवर आणि मुलांचं त्यांच्या आईवर अगदी जीवापाड प्रेम असत. प्रत्येकाची आईवरच प्रेम व्यक्त करण्याची पद्धत हे वेगवेगळी असते. प्रत्येकाला वाटत कि आईसाठी काहीतरी खास स्वतःच्या हाताने बनवाव पण अनेक जणांना प्रश्न पडतो कि काय बनवायच किंवा अनेकांना ते बनवता येत नाही. त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत रहा कारण आमच्या स्पेसिअल रेसिपी तुम्ही या मदर्स डे ला तुमच्या स्वतःच्या हातानी आईसाठी पाईनऍपल (Pineapple) केक बनवू शकता. आणि मदर्स डे अगदी छान प्रकारे साजरा करू शकता. आजकाल केक कटिंग शिवाय कोणतीही पार्टी हि अपुरीच मानली जाते. म्हणूनच तुम्ही सुद्धा तुमच्या आईला केक बनवून मातृदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. तर जाणून घ्या आमच्या खास पाईनऍपल(Pineapple) केक ची रेसिपी आणि तुमचा मदर्स डे बनवा खास.

पाईनऍपल केक साठी लागणारे साहित्य:

मैदा १ कप, बेकिंग पावडर (Baking powder) १ चमचा, चवीनुसार मीठ, साखर १ कप, ताक १ कप, व्हॅनिला इसेन्स १ चमचा, तेल १/४ कप, साखर सिरप १/४ कप, कॉर्नफ्लॉवर (Cornflower) १ चमचा, अननस क्रश १/४ कप, फ्रेश क्रीम (Fresh cream)

पाईनऍपल केक बनवण्याची कृती:

सर्वप्रथम एक मोठा मिक्सिंग बाउल घ्या. त्यानंतर त्या मिक्सिंग बाऊलमध्ये केकचे बॅटर तयार करण्यासाठी मैदा, बेकिंग पावडर, आणि चिमूटभर मीठ चाळून घ्या. त्यानंतर दुसरा बाउल घेऊन त्यामध्ये बटर मिल्क( Butter milk), आणि साखर टाका. व इलेक्ट्रिक बिटर (Electric Bitters) ने ते विरघळेपर्यंत एकत्र करून घ्या. याच मिश्रणात बेकिंग सोडा घाला व ५ मिनिटे सेट होऊ द्या. सेट झाल्यावर त्याच मिश्रणात व्हॅनिला इसेन्स घालून घ्या व मोठ्या मिक्सिंग बाउल मध्ये असलेल्या मिश्रणात हे मिश्रण एकत्रित करून बॅटर बनवून घ्या. त्यांनतर पिठामध्ये १/४ कप तेल घालून चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. तयार झालेले मिश्रण ७ इंचाच्या केक टिनमध्ये ओतून घ्या. त्यांनतर ४ मिनिटे १८०c या तापमानावर तो मायक्रोवेव्ह (Microwave ) मध्ये प्रीहीट करून घ्या. त्यानंतर प्रीहिटेड ओव्हन (oven) मध्ये हा के ३० ते ४० मिनिटे बेक (Bake) करून घ्या. केक थंड झाल्यावर त्याचे दोन थर बनवा. त्यानंतर केक वर क्रिम लावून त्यावर शुगर सिरप, अननसाचे तुकडे, पाईनऍपल जेरी लावून केक वर सजावट करून घ्या. आणि अश्याप्रकारे तुमचा पाईनऍपल केक तयार होईल.

हे ही वाचा : 

Dadar मधील Foods Mafiya स्टॉलवर मिळतो Butter Chiken Pav

केळीचे साल केसांसाठी उपयुक्त , जाणून घ्या कसा

Mother’s Day ची सुरवात नक्की कशी झाली? घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss