Saturday, June 3, 2023

Latest Posts

Mother’s Day ची सुरवात नक्की कशी झाली? घ्या जाणून

आपल्या आयुष्यात 'आई' हा शब्द अणि ही व्यक्ति खुप महत्वाची आहे. आपल्या आई विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

आपल्या आयुष्यात ‘आई’ हा शब्द अणि ही व्यक्ति खुप महत्वाची आहे. आपल्या आई विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिन साजरा केला जातो. आईची माया, प्रेम यांची तुलना जगातील कुठल्याच आणि कोणत्या गोष्टीशी होऊ शकत नाही. आईच्या पोटी एकदा मूल जन्माला आलं कि, तीच संपूर्ण आयुष्य त्याच्यातच गुंतून जात .आईची खूप निस्वार्थ अशी माया असते.

मातृदिन (Mother’s Day) ची सुरुवात कशी झाली

मातृदिन हा पहिला ‘ग्रीक’ (Greek) आणि ‘रोमन’ (Roman) लोकांनी प्राचीन युगात सुरू केला होता. तसेच, ब्रिटनमध्ये ‘मदरिंग रविवार’ (Mothering Sunday) म्हणून देखील हा दिवस साजरा करतात. हे जुन्या काळाने नव्हे तर आताच्या पद्धतीने साजरी केले जाते. जगातील जवळपास ४६ देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांवर हा दिवस साजरा केला जातो. जेव्हा प्रत्येकासाठी आपल्या आईचा सन्मान करण्याची संधी मिळते तेव्हा प्रत्येकासाठी ही मोठी गोष्ट ठरते. आम्ही त्यासाठी धन्यवाद म्हणतो जे मातृदिन साजरा करण्याचे कारण बनले आहेत.

आई ही आयुष्यभर आपल्या मुलासाठी एकनिष्ठ असते. आपल्या परिवारचा विचार करून चालत असते , तिने तिचा पूर्ण वेळ आपल्यासाठी काढलेला असतो पण आपण मात्र तिला थोडा वेळ देऊ शकत नाही. आपल्याला तिचा आदर, सन्मान केला पाहिजे आणि हे आपण मातृदिनानिमित्त तिला तिच्या आयुष्यतला सर्वांत आनंदाचा दिवस जाईल अस वागलं पाहिजे. आई हि पहिली व्यक्ती आहे जी आपली मूले शाळेतसोडण्यापासून ते घरी येईपर्यंत त्याची वाट बघत असते. ती त्यांच्या जन्मापासून अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मुलांची काळजी घेते.

मातृदिन कसा साजरा करतात –

प्रत्येक मुलाला वाटत कि आपण साजरा केलेला मातृदिन हा त्याच्या आईसाठी खूप स्पेशल असावा, त्यासाठी ते तिला केक्स आणतात, ग्रीटिंग बनवतात, तिच्यासाठी तीला घेऊन शॉपिंग ला जातात. आणि अजून थोडा जास्त चांगलं वाटावं तिला म्हणून एक छोटी नोट लिहतात जे तिला वाचून चांगलं वाटेल. त्या दिवशी मूल आपला पूर्ण वेळ हा आई ला देतात. संपूर्ण भारतभरात या आधुनिक काळात सेलिब्रेट करायचे मार्ग बरेच बदलले गेले आहेत.आई अशी व्यक्ती आहे जी आपल्या प्रेमळ प्रेमातून आपले आयुष्य इतके सोपे आणि सुलभ करते.अश्या सध्या आणि निरागस पद्धतीने मातृदिन हा दिवस साजरा केला जातो.

हे ही वाचा : 

कोकण स्पेशिअल चमचमीत फणसाची भाजी माहीत आहे कशी बनवतात? जाणून घ्या आमच्या स्पेशिअल रेसिपी मधून!

न्यू स्टाईलमध्ये बनवा White Sauce Pasta

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss