Tuesday, April 30, 2024

Latest Posts

सर्वसामान्यांना महागाईचा फटका; डाळींसह झाली फळांच्या किंमतीत वाढ

गेल्या काही काळापासून महागाई सतत वाढतच असल्याची दिसून येत आहे. प्रत्येक ठिकाणी अनेक गोष्टींच्या किंमती वाढताना दिसून येत आहे. हि महागाई कमी होण्याचं नाव मात्र घेत नाहीये. भारत सरकार महागाई नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजना आखत असते. परंतु याचाही काही खास परिणाम दिसून येत नाही. सध्या तर डाळींसह फळांच्या दरात वाढ झालेली दिसून आलीये.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात कुठलीही महागाई होऊ नये यावर सरकार लक्ष देत आहे. हि महागाई नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळे धोरणेही आखत आहे. तरीही काही वस्तूंची महागाई कमी होताना दिसत नाहीये. सध्या डाळींसह केळी, द्राक्षे, पपई यांच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. महिनाभरात डाळीच्या किमतींनी झेप घेतलीये, ज्यामुळे सामान्यांच्या खिशाला ते न परवडणारे आहे. याचबरोबर द्राक्षे, केळी, पपई, हि साधी साधी फळ देखील महागली आहेत. डाळींबद्दल बोलायचं झालं तर तुरीच्या डाळीच्या किंमती वाढलेल्या दिसून येत आहेत. तुरीची डाळ १७० रुपये प्रतिकिलो पर्यंत गेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना ती परवडत नसल्याची दिसून येत आहे. तुरीच्या डाळीमध्ये ७ ते ८ रुपयाची वाढ मागील दोन तीन दिवसात दिसून आली आहे. तर महिनाभरात २० रुपयांची वाढ तुरीच्या डाळीमध्ये झाली आहे. महिनाभराचं बघता तब्बल २० रुपयांच्या वाढीचा पल्ला तुरीच्या डाळीने गाठला आहे.

फळांबाबत बोलायचं झालं तर द्राक्षे, सफरचंद, केळी आणि पपई यांच्या दरात मोठी वाढ झाल्याची दिसून येत आहे. द्राक्षे ४० रुपयांनी महागलेले असून, ती ८० रुपये प्रतिकिलो वरून १२० रुपये प्रतिकिलो वरती पोहोचली आहेत. तसेच पपई ५० रुपयांवर ९० रुपयांवर पोहोचली आहेत. आणि ५० रुपये डझनाने मिळणारी केळी ७० ते ८० रुपये प्रतिकिलो वरती जाऊन पोहोचली आहेत. यामुळे महागाईवरती एकच चर्चा सर्वसामान्यांमध्ये चालू असल्याची दिसून येते.

Latest Posts

Don't Miss