Tuesday, April 30, 2024

Latest Posts

रामनवमी निमित्त द्या या ‘पावन’ जागेस भेट, मुंबईकरांना मिळालेला ऐतिहासिक वारसा

प्रत्येक मुंबईकरांस अयोध्येस जाता येणार नाही. तरीही आपल्याच मुंबई मध्ये असणाऱ्या बाणगंगा या स्थळास भेट देऊन रामनवमीचा अनुभव घेता येऊ शकतो.

येत्या १७ एप्रिल रोजी रामनवमीचा सण सर्वत्र साजरा केला जाईल. यावेळची रामनवमी विशेष असेल यात काही शंकाच नाही. नुकतेच राममंदिराचे कार्य पूर्ण झाले आहे. यावेळी अयोध्येमध्ये रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेनुसार भगवान श्री रामांना सुर्याभिषेक ही करण्यात येणार आहे. हा अविस्मरणीय सोहळा पाहण्यासाठी एकच गर्दी अयोध्येमध्ये जमणार असून अयोध्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे. तरीही प्रत्येक मुंबईकरांस अयोध्येस जाता येणार नाही. तरीही आपल्याच मुंबईमध्ये असणाऱ्या बाणगंगा या स्थळास भेट देऊन रामनवमीचा अनुभव घेता येऊ शकतो.

मुंबईतील वाळकेश्वर येथे हा बाणगंगा तलाव आहे. चर्नी रोड आणि ग्रॅण्ट रोड वरून टॅक्सी करून बाणगंगाला जाता येईल. बाणगंगा ही आयताकृती पाण्याची टाकी असून तलावाच्या आवारात पुष्कळ मंदिरे आहेत. हा तलाव झऱ्यामार्फत भरला जातो आणि आवारात अनेक बदक आपल्याला दिसून येतात. तलावाच्या दक्षिण बाजूस दगडी वास्तू आणि कोरीव मूर्ती देखील आहेत, ज्या बाणगंगाच्या इतिहासाची झलक देतात. तलावाच्या परिसरात वाळुकेश्वर मंदिर आहे. ज्यातील शिवलिंग प्रभू श्री रामांनी वाळू पासून बनवले असल्याचे सांगितले जाते. आणि त्यामुळेच वाळुकेश्वर हे नाव पडून काळाच्या ओघात वाळुकेश्वरचे वाळकेश्वर हे नाव पडले आहे. बाणगंगाच्या उत्पतीचा संबंध थेट रामायण काळाशी सांगितला जातो.

प्रभू श्री राम, सीता मातेच्या शोधात येथे आले होते. त्यांनी जमिनीवर बाण मारून भूमिगत गंगेच्या पाण्याचा जारा येथे निर्माण केला म्हणून हे ठिकाण बाणगंगा म्हणून नावारूपास आले. बाणगंगाच्या काहीच अंतरावर समुद्र देखील आहे.परिसरात श्रीराम, सिद्धेश्वर, परशुराम, लक्ष्मीनारायण, रामेश्वर अशी बरीच मंदिरे आहेत. २०१६ पासून येथे महाआरतीचे आयोजन केले जाते, जे वाराणसीच्या गंगा आरतीसारखा अनुभव देणारी असते. म्हणूनच या जागेला लहान वाराणसी (Mini Waranasi) असे देखील म्हणतात. रामनवमी च्या दिवशी बाणगंगामध्ये विशेष तयारी केली जाते. संपूर्ण परिसर ध्वज लावून सजवला जातो. याचबरोबर परशुरामांची आरती, तसेच भजन संध्येचे आयोजन देखील केले जाते. महाआरती झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. याचबरोबर परिसरातून मिरवणूक देखील निघते. अश्या वेळेस वातावरण अगदी भक्तिमय होऊन जाते. रामनवमीच्या दिवशी असा अनुभव आनंद देणारा ठरेल.

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss